News Flash

२०३० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था राहिल तिसऱ्या स्थानी; अव्वलस्थानी असेल ‘हा’ देश

करोनाच्या संकटामुळे बिघडली जगाची गणितं

भारतीय अर्थव्यवस्था ही सन २०२५ पर्यंत जगातील पाचवी तर सन २०३० मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल, असं भाकीत सेंटर ऑफ इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च (सीईबीआर) या संस्थेनं वर्तवलं आहे. या संस्थेच्या एका अहवालात याबाबत उल्लेख करण्यात आला आहे. भारत सन २०१९ मध्ये ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला होता. मात्र, सन २०२० मध्ये भारत पुन्हा सहाव्या स्थानावर फेकला गेला.

सीईबीआरच्या अहवालात म्हटलं की, करोना महामारी आणि रुपयाची डळमळीत स्थिती यामुळे भारत सहाव्या स्थानी ढकलला गेला. या वर्षी ब्रिटनने भारताला मागे टाकलं होतं. पण भारत २०२५ मध्ये पुन्हा ब्रिटनच्या पुढे निघून जाईल.

भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ९ टक्के आणि २०२२ मध्ये ७ टक्क्यांनी वाढेल असंही सीईबीआरने म्हटलं आहे. आर्थिक स्वरुपात भरभराट झाल्यानंतर स्वाभाविकपणे भारताचा वेग कमी होईल आणि सन २०३५ मध्ये जीडीपीची वाढ ५.८ टक्के राहिल. यादरम्यान भारत सन २०३० मध्ये जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. तसेच भारत २०२५ मध्ये ब्रिटन, २०२७ मध्ये जर्मनी आणि २०३० मध्ये जपानला मागे टाकेल, असंही या अहवालात म्हटलं आहे.

चीन असेल अव्वलस्थानी

सीईबीआरच्या अहवालानुसार, चीन २०२८ मध्ये अमेरिकेला मागे टाकत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की चीन २०३३ पर्यंत या स्थानावर पोहोचेल. मात्र, कोविड-१९ महामारीने परिस्थिती बदलून टाकली. चीन वेगाने या संकटातून बाहेर पडला आहे. तर अमेरिकेचा अजूनही संघर्ष सुरुच आहे. याच कारणामुळे चीन पाच वर्षांमध्येच अमेरिकेपेक्षा पुढे निघून जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 3:30 pm

Web Title: india to become 5th largest economy in 2025 3rd largest by 2030 aau 85
Next Stories
1 मोठी बातमी! मॉडर्ना करोना लस घेतलेल्या डॉक्टरला अ‍ॅलर्जी, रुग्णालयात दाखल
2 शोपियानमध्ये जोरदार चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
3 “हलाल मांस हिंदू, शीख धर्माविरोधात; रेस्तराँ मालकांनी मांस कोणतं ते स्पष्टपणे लिहावं”
Just Now!
X