यंदाचे वर्ष हे जलसंवर्धन वर्ष म्हणून जाहीर करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. पाण्याचे सर्वदूर जतन करण्यासाठी यंदाच्या वर्षी विविध जागृती कार्यक्रम हाती घेण्यात येतील.
समााजात, विशेषत: मुलांमध्ये पाण्याच्या बचतीची जाणीव निर्माण करण्यासाठी जलविकास मंत्रालयातर्फे विविध कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात येईल. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १८ टक्क्य़ांनी अधिक आहे, तर जगाच्या पातळीवर पाण्याची उपलब्धता केवळ चार टक्केच असल्यामुळे पाण्याच्या संवर्धनासाठी युद्धपातळीवर उपाय योजण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.