जागतिक आरोग्य संघटनेची निर्णयप्रक्रियेतील सर्वोच्च संस्था असलेल्या जागतिक आरोग्य परिषदेच्या (वर्ल्ड हेल्थ असेंब्ली- डब्ल्यूएचए) सोमवारपासून सुरू होणाऱ्या ६८व्या सत्राचे अध्यक्षपद भारत भूषवणार आहे. भारताला १९ वषांनंतर ही संधी मिळाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा हे जिनिव्हा येथे १८ ते २७ मे या कालावधीत होऊ घातलेल्या डब्ल्यूएचएच्या सत्राचे अध्यक्षपद भूषवणार असून, या परिषदेत सहभागी होणाऱ्या भारताच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे नेतृत्वही करणार आहेत, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.