News Flash

सीमावर्ती भागात लवकरच भारतीय रेल्वेचे जाळे

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून भारताच्या संरक्षण सिद्धतेसमोर वारंवार उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी

| October 28, 2013 12:53 pm

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून भारताच्या संरक्षण सिद्धतेसमोर वारंवार उभ्या राहणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सीमावर्ती भागात रेल्वेमार्गाचे जाळे भारण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. सैन्याच्या, सामग्रीच्या हालचाली जलदगतीने करता याव्यात, यासाठी हे १४ रेल्वेमार्गाचे जाळे विणण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या परिसरात ७३ मार्गही बांधले जात आहेत.
जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये १४ विविध रेल्वेमार्गाचे जाळे उभारले जाणार असून त्यापैकी १२ रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. भारताच्या चीनला लागून असलेल्या सीमारेषेवर ३८१२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यापैकी ३४०४ किलोमीटर लांबीच्या ६१ मार्गाचे काम ‘बॉर्डर रोडस् ऑर्गनायझेशन’ या संस्थेकडे देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 12:53 pm

Web Title: india to lay 14 strategic railway lines near china pak border
Next Stories
1 २६/११ संबंधीचे महत्त्वाचे पुरावे पाकिस्तानला सुपूर्द
2 बांगलादेशातील हिंसाचारात ५ ठार
3 पाटणा स्फोटांबाबत अडवाणींकडून विचारणा
Just Now!
X