भारताने शेजरी देश असणाऱ्या बांगलादेशला करोना लसींचे २० लाख डोस पाठवण्याची तयारी सुरु केली आहे. असं असतानाच पाकिस्तानलाही भारतामध्ये निर्माण करण्यात आलेल्या करोना लसीची अपेक्षा आहे. भारताशी थेट संवाद साधून किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मित्र राष्ट्रांच्या मदतीने भारतात तयार करण्यात आलेली करोना लस मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे असं वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

बांगलादेशमधील सरकारी अधिकाऱ्यांनी बुधवारी म्हणजेच २० जानेवारी रोजी विशेष विमानाने देशामध्ये सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ या लसीचे २० लाख डोस देशामध्ये आणले जाणार असल्याची माहिती दिली आहे. ढाक्यामध्ये हे विमान उतरणार आहे. ढाक्यामधील भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते लसींचा हा साठा बांगलादेशमधील अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. बांगलादेशमध्ये करोनाचे पाच लाखांहून अधिक रुग्ण असून आतापर्यंत देशात करोनामुळे सात हजार ९०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

नक्की वाचा >> …तर अशा व्यक्तींनी आमची कोवॅक्सीन लस घेऊ नये; ‘भारत बायोटेक’नेचं केलं आवाहन

पाकिस्तानमधील ड्रग कंट्रोलर ऑफ पाकिस्तान म्हणजेच डीआरएपीने ऑक्सफर्ड आणि अल्ट्राझेन्काच्या करोना लसीच्या आत्पकालीन वापरासाठी परावनागी दिली आहे. त्यानंतर भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली ही लस मिळवण्यासाठी पाकिस्तानने हलचाली सुरु केल्यात. पाकिस्तानमध्ये पाच लाखांहून अधिक करोनाबाधित असून येथे ११ हजारांहून अधिक जणांना करोनामुळे मृत्यू झालाय.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर लसीकरणासाठी स्थापन कऱण्यात आलेल्या कोव्हॅक्सच्या माध्यमातून भारतीय लस मिळवण्याचा इस्लामाबादचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कोईलेशन फॉर पॅनडॅमिक प्रिपेडनेस इनोव्हेशन (सीईपीआय) आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीनेही भारतातील लस पाकिस्तानामध्ये आणता येईल या यासंदर्भातील विचार सुरु आहे. कोव्हॅक्सच्या माध्यमातून जगभरातील १९० देशांमधील जागतिक लोकसंख्येच्या २० टक्के लोकांना मोफत लस देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानचाही समावेश आहे. दुसऱ्या तिमाहीमध्ये पाकिस्तानला कोव्हॅक्सच्या माध्यमातून लसींचा पहिला पुरवठा केला जाईल अशी अपेक्षा आहे.

नक्की वाचा >> गांजा वाचवू शकतो करोना रुग्णांचे प्राण; संशोधकांचा दावा

मात्र कोव्हॅक्सने मदत केली तरी पाकिस्तानमधील उर्वरित लोकसंख्येला सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ या लसीवर अवलंबून रहावं लागणार आहे. यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान तिसऱ्या देशाच्या मदतीने भारताकडून ही लस विकत घेऊ शकतो. मात्र असं केल्यास त्यांना यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहता हा पर्याय त्यांना परवडणारा नाही.

नक्की वाचा >> Corona Vaccination : कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणार देशातील ‘या’ बड्या कंपन्या; लस खरेदीसाठी हलचाली सुरु

पाकिस्तान सरकारला लसींचा पुरवठा करण्यासाठी काही आठवड्यांपूर्वी भारतामधील एका लस निर्मिती कंपनीने पाकिस्तान सरकारशी संपर्क साधल्याची माहिती सुत्रांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे. दोन्ही देशांमधील संबंध फारसे चांगले नसून अनेक गोष्टींचा व्यापार थांबवण्यात आला आहे. असं असलं तरी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर याचा परिणाम होऊ देणार नाही अशी दोन्ही देशांची भूमिका असल्याने लस मिळवण्यामध्ये पाकिस्तानला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. २०१९ साली झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार बंद आहे. त्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्ताननेही व्यापारावर निर्बंध घातलेत.

नक्की वाचा >> करोना : ‘तो’ १९ ऑक्टोबरपासून अमेरिकेतील विमानतळावरच राहत होता, कारण विचारल्यावर म्हणाला…

दिल्लीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानसरकारने अद्याप भारत सरकारकडे करोना लसीसंदर्भात अधिकृतपणे विचारणा केलेली नाही. मात्र दोन्ही देशांमध्ये लसीसंदर्भात चर्चा झाल्यास दोन्ही देशांमधील संवाद नव्याने सुरु होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोव्हिशिल्डची परिणामकारकता ९० टक्क्यांपर्यंत असल्याने डीआरएपीने या लसीची अधिकृत नोंदणी करुन घेत तिच्या वापरला परवानगी दिली असल्याचे पाकिस्तानमधील सुत्रांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आता ही लस मिळवायची कशी असा प्रश्न पाकिस्तानसमोर आहे. म्हणजेच पाकिस्तानला पुण्यामधील सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाने बनवलेली मेड इन पुणे लस हवी आहे मात्र त्यासाठी भारताकडे कशापद्धतीने मागणी करावी हे अद्याप पाकिस्तानलाच सुटलेलं कोडं आहे.

नक्की वाचा >> इस्रायल : करोना लसीकरणानंतर १३ जणांना Facial Paralysis; साईड इफेक्ट झालेल्यांचा आकडा वाढण्याची भीती