भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या अमेरिकेबरोबरच्या संयुक्त कवायतीत सहभाग घेतला. दोन्ही देशांतील सागरी सुरक्षा दलांमध्ये सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा हेतू त्यात आहे.

तटरक्षक दलाची जहाजे व विमानांनी बंगालच्या उप सागरातील या कवायतीत प्रात्यक्षिके केली. भारताच्या बाजूने आयसीजी शौर्य व आयसीजडी अभीक ही जहाजे व चेतक हेलिकॉप्टर या सरावात सहभागी झाले होते.

सागरी चाचेगिरीविरोधातील उपायांचा अभ्यास व प्रात्यक्षिकांचा यात समावेश होता. अमेरिकेचे स्ट्रॅटॉन हे जहाज व एक विमान प्रात्यक्षिक व सरावात सहभागी होते.

शुक्रवारी सकाळी सात वाजता सराव व प्रात्यक्षिकास सुरुवात झाली. स्ट्रॅटन या अमेरिकी जहाजाची ही पहिली भारत भेट होती. चेन्नई बंदरानजीक  सागरात या संयुक्त कवायती घेण्यात आल्यानंतर आता अमेरिकेचे हे जहाज २७ ऑगस्टला परत जाणार आहे. त्यापूर्वी भारत व अमेरिका यांच्या अधिकाऱ्यांत संवादही होईल.