भारत अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेने जास्त शूल्क लावू नये, अशी भारताची इच्छा आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेचे सहायक व्यापार प्रतिनिधी मार्क लिनस्कॉट यांच्या भारत दौऱ्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ट्रम्प यांची ही दुसरी वेळ आहे. लिनस्कॉट यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि संभावित व्यापार समजोत्यावरुन चर्चा झाली होती.

उल्लेखनीय म्हणजे, ट्रम्प हे नेहमी भारत हा अमेरिकन उत्पादनांवर १०० टक्के शूल्क घेत असल्याचा आरोप करत आले आहेत. ट्रम्प म्हणाले, भारताकडे पाहा, तुम्ही मुक्त व्यापाराबाबत बोलत असता. आम्ही सांगू इच्छितो की, त्यांनी जर एखाद्या उत्पादनावर ६० टक्के शूल्क लावले आणि जर तेच उत्पादन ते (अमेरिकेला) पाठवतात तर आम्ही त्यावर काहीच शूल्क लावत नाही. त्यामुळे आता मी त्यावर २५ किंवा २० किंवा १० टक्के या पद्धतीने शूल्क लावू इच्छितो.

भारताबरोबर चर्चेचा हवाला देताना ट्रम्प म्हणाले, तुम्हाला काय वाटते, हा मुक्त व्यापार नाही. आम्हाला हे पसंत नाही. हे लोक कुठून येत आहेत, त्यासाठी याबाबत विचार करा. तुम्हाला अंदाज नाही की हे किती कठीण आहे. भारताचे नाव फक्त उदाहरण म्हणून आहे. मी इतरही काही देशांचे उदाहरण देऊ शकतो, जे अमेरिकाप्रती कठोर भूमिका घेतात.