News Flash

जागतिक व्यापार संघटनेची चर्चा निष्फळ

जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांमध्ये व्यापार सुविधा कराराबाबत मतैक्य होण्यात अपयश आले असून, जागतिक सीमाशुल्क नियमांचे सुलभीकरण करता आलेले नाही.

| August 2, 2014 02:40 am

जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांमध्ये व्यापार सुविधा कराराबाबत मतैक्य होण्यात अपयश आले असून, जागतिक सीमाशुल्क नियमांचे सुलभीकरण करता आलेले नाही.
असे असले तरी भारताने करारास वचनबद्ध राहून अन्नसुरक्षेबाबत कायमचा तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. व्यापार सचिव राजीव खेर यांनी सांगितले, की आता महिनाभर जागतिक आरोग्य संघटनेला सुटी आहे. त्या काळात भारत पुढची कृती करील. पाठपुराव्याची कृती करण्यासाठी आम्ही एक प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेकडे मांडला आहे व त्याचा आम्ही पाठपुरावा करू.
काल रात्री जागतिक व्यापार संघटनेच्या १६० सदस्यांची बैठक जीनिव्हा येथे झाली ती जागतिक सीमाशुल्क करारावरून म्हणजेच व्यापार सुविधा करारावरून अपयशी ठरली.
व्यापार सुविधा करारास भारत नेहमीच वचनबद्ध आहे. आम्ही कधीही या कराराच्या अंमलबजावणीवर माघार घेतलेली नाही. गरीब लोकांसाठी अन्नधान्याचा सार्वजनिक साठा करून ठेवण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला आहे, पण जागतिक व्यापार संघटनेच्या महासंचालकांकडे तो मांडूनही त्यावर मतैक्य होऊ शकले नाही.
पाश्चिमात्य देश जीनिव्हा बोलणी अपयशी ठरण्यास भारताला दोषी धरत आहेत असे विचारले असता खेर यांनी सांगितले, की दोष देण्याचा काही प्रश्नच नाही. ३१ जुलै ही काही अखेरची मुदत नाही, ती वाढवता येऊ शकते. व्यापार सुविधा करारास आम्ही वचनबद्ध आहोत.
आठवडाभर चर्चा झाल्यानंतर जागतिक व्यापार संघटनेचे प्रमुख रॉबटरे अ‍ॅझेवोडो यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या दूतांना सांगितले, की मोठय़ा प्रमाणात चर्चा होऊनही तोडगा निघू शकला नाही. आम्ही मतैक्याच्या जवळ पोहोचलो होतो, पण पूर्ण मतैक्य होऊ शकले नाही. दरम्यान, आता जागतिक व्यापार संघटनेच्या सचिवालयास महिनाभर उन्हाळी सुटी लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 2:40 am

Web Title: india wto deal dead
Next Stories
1 मुझफ्फर अली यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार
2 ‘मोदींना व्हिसा नाकारला तो आधीच्या सरकारने’
3 सुब्रतो रॉय ‘तिहार’मध्ये खरेदीदारांशी वाटाघाटी करणार!
Just Now!
X