संरक्षण क्षेत्रात स्वत:ला अधिक बळकट करत भारतानं मोठं यश संपादन केलं आहे. स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडने (एसएफसी) आणि भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) डिझाइन केलेले कमी पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (पृथ्वी शॉर्ट-रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र) यशस्वी चाचणी केली.

बुधवारी ओडिशाच्या बालासोर किनाऱ्यावरून या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्राने एसएफसीने ठरवलेल्या आपल्या मोहिमेचा प्रत्येक उद्देश पूर्ण केला. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्र (आयटीआर) येथून सोडण्यात आलं. तसंच ही चाचणी यशस्वी ठरल्याचंही सांगण्यात आलं. “३५० किलोमीटरपर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आयटीआरच्या परिसर-३ मध्ये मोबाईल लाँचरद्वारे सोडण्यात आलं,” अशी माहिती डीआरडीओच्या एका अधिकाऱ्यां दिली.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम

पृथ्वी हे पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे १५० किलोमीटर ते ६०० किलोमीटरपर्यंतचाही पल्ला गाठू शकतं. पृथ्वी या सीरिजची तीन क्षेपणास्त्र आहेत. पृथ्वी-I, II, III ही क्षेपणास्त्र असून त्यांची मारक क्षमता अनुक्रमे १५० किलोमीटर, ३५० किलोमीटर आणि ६०० किलोमीटर इतकी आहे.