26 September 2020

News Flash

Video : करोना योद्ध्यांना एअर फोर्सकडून अनोखी मानवंदना

कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्सने फ्लाय पास्ट केले आहे.

करोना व्हायरसविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोविड योद्ध्यांना भारतीय सेनाकडून अनोख्या पद्धतीनं सलामी दिली जात आहे. रविवारी आज सकाळी ९ ते १०.३० या वेळेत हा कार्यक्रम झाला.

भारतीय हवाईदलाकडून सुखोईसारख्या लढावू विमानांनी कोलकाता, मुंबई आणि दिल्लीसारख्या देशातील वेगवेगळ्या शहरात कोविड रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करत आहे. भारतीय लष्कराचे बॅन्ड या रुग्णालयांजवळ करोना योद्ध्यांचं मनोबल वाढवणार आहेत. तर भारतीय नौदल आपल्या युद्धनौका दिव्यांनी उजळवत करोना योद्धांना सलामी देणार आहे.


कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्सने फ्लाय पास्ट केले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरातचं कच्छ असे दोन फ्लायपास्ट एअर फोर्सकडून करण्यात आले. यामध्ये सुखोईसारखी भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा समावेश होता. समुद्रात भारतीय नौदलांकडूनही कोविड योद्ध्यांना सलामी देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2020 11:27 am

Web Title: indian air force aircraft flypast coronavirus warriors nck 90
Next Stories
1 कुलभूषण जाधवांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरु – हरिश साळवे
2 काश्मिरात धुमश्चक्री; लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद
3 Lockdown: राज्यांच्या विनंतीनुसारच विशेष रेल्वे सुरु, इतर गाड्या अद्याप बंदच – रेल्वे मंत्रालय
Just Now!
X