News Flash

जगातून निवृत्त झालेल्या विमानावर भारतीय हवाई दल अवलंबून

हवाई दलाला आपल्या ताफ्यातील फायटर विमानांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे.

भारतीय हवाई दल आधीच फायटर विमानांच्या स्क्वाड्रन  समस्येचा सामना करत आहे. त्याचवेळी हवाई दलाला आपल्या ताफ्यातील फायटर विमानांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी मोठया प्रमाणावर दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. भारतीय हवाई दलात अजूनही जी फायटर विमाने कार्यरत आहेत त्याचा वापर अन्य देशांनी थांबवला आहे.

भारतीय हवाई दलाला ही विमाने कार्यरत ठेवण्यासाठी दुसऱ्या देशांची मदत घ्यावी लागत आहे. भारताला जॅग्वार विमानांसाठी लागणारे सुट्टे भाग ओमान, फ्रान्स आणि युकेकडून मिळणार आहेत. त्यामुळे या फायटर विमानांचे आयुष्य वाढवता येणार आहे. जॅग्वार ही मुळची ब्रिटीश बनावटीची विमाने आहेत. भारतीय हवाई दलाकडे सध्या ११८ जॅग्वार विमाने आहेत. पण ही विमाने जुनी झाल्यामुळे त्यांची युद्ध क्षमता मोठया प्रमाणावर कमी झाली आहे.

या विमानांचे सुट्टे भागही सहजासहजी मिळत नाहीत. त्यामुळे या विमानांना लढण्यायोग्य स्थितीत ठेवणे एक आव्हान आहे. या विमानांचे एअरफ्रेम आणि सुट्टे भाग मिळवण्यासाठी शोध सुरु आहे असे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारताकडे जॅग्वारच्या पाच स्क्वाड्रनमध्ये ८० विमाने आहेत. या विमानांमध्ये सुधारणा करण्याची १.५ अब्ज डॉलरच्या खर्चाची योजना आहे.

१९७९ साली भारताने यूकेकडून ४० जॅग्वार विमाने विकत घेतली होती. त्यानंतर एचएएलने १५० विमानांची निर्मिती केली. फ्रान्स आणि यूकेने त्यांच्याकडे असलेल्या जॅग्वार विमानांचा वापर २००५ ते २००७ दरम्यान पूर्णपणे थांबवला. भारताने त्यांच्याकडे असलेल्या जॅग्वार विमानांमध्ये एफ-१२५ आयएन इंजिन बसवल्यानंतर २०३५ नंतर सुद्धा ही विमाने कार्यरत राहतील असे सूत्रांनी सांगितले. भारताला फ्रान्सकडून जॅग्वारच्या ३१ एअरफ्रेम, ओमानकडून आठ इंजिन दोन एअरफ्रेम मिळणार आहेत. फ्रान्स आणि ओमान हे भाग भारताला पूर्णपणे मोफत देणार आहे भारताला फक्त वाहतुकीचा खर्च उचलावा लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2018 12:30 pm

Web Title: indian air force depend for spare parts on other countrys
टॅग : Indian Air Force
Next Stories
1 आपच्या दोन आमदारांना कॅनडात प्रवेश नाकारला, विमानतळावरूनच भारतात धाडले
2 देशाबाबतचा विनोद गुजरात विद्यापीठाला झोंबला, कुणाल काम्राचा कॉमेडी शो रद्द
3 पती- पत्नीच्या भांडणात मुलीचा बळी, महिलेने केली १२ वर्षांच्या मुलीची हत्या
Just Now!
X