News Flash

पंजाबमध्ये भारतीय हवाई दलाचे ‘मिग-21’ दुर्घटनाग्रस्त, पायलटचा मृत्यू

भारतीय हवाई दलाने दिली माहिती

पंजाबच्या मोगा येथे रात्री १ वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान मिग २१ क्रॅश झाले. प्रशिक्षणासाठी पायलट अभिनवन यांनी राजस्थानच्या सूरतगडहून मिग-२१ ने उड्डाण घेतले होते. या दरम्यान पश्चिम क्षेत्रात ते कोसळले. यामध्ये विमानाचे पालयट स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी गंभीररित्या जखमी झाले होते. शुक्रवारी सकाळी पायलट अभिनव यांचा मृतदेह हाती घेण्यात आला आहे. या संपूर्ण अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अभिनव यांच्या मृत्यूवर हवाई दलाने शोक व्यक्त केला आहे.

मोगा मधील बागपुराणा या गावी लंगियाना खुर्द जवळ रात्री १ वाजण्याच्या सुमारास लढाऊ विमान मिग-२१ चा अपघात झाला. माहिती मिळताच प्रशासन आणि सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन बरीच मेहनत घेतल्यानंतर पायलटचा मृतदेह बाहेर काढला, अशी माहिती भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पायलट, स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी यांचा या अपघातात मृत्यू झाल्यामुळे आयएएफने या शोक व्यक्त केला. तसेच भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

यापूर्वीही १७ मार्च २०२१ रोजी एका मिग-२१ चा अपघात झाला होता. या अपघातात ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी ५ जानेवारी रोजी राजस्थानच्या सूरतगढ एअरबेसवर एका मिग-२१ बायसन विमानाला अपघात झाला होता. आतापर्यंत मिग-२१ झालेला हा तिसरा अपघात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2021 9:39 am

Web Title: indian air force mig 21 crashes in punjab the death of the pilot srk 94
Next Stories
1 दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोलचे दर कडाडले ; मुंबई शतकाजवळ
2 इस्रायल- पॅलेस्टाइनदरम्यान युद्धविरामाची घोषणा; १० दिवसात २४४ जणांनी गमावले प्राण
3 म्युकरमायकोसिस साथरोग!
Just Now!
X