भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘राफेल’ हे अत्याधुनिक फायटर विमान दाखल झालं आहे. फोर प्लस जनरेशनचे असलेले हे फायटर विमान अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण आहे. आपला पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानकडे सध्या तरी ‘राफेल’च्या तोडीचं कुठलही फायटर विमान नाहीय. राफेलचे हरयाणाच्या अंबाला बेसवर लँडींग झाले. हे विमान मिटिओर, स्काल्प सारख्या घातक मिसाइल्सनी सुसज्ज आहे.

पण इंडियन एअर फोर्स आता राफेलला अधिक घातक बनवण्याचा विचार करत आहे. राफेलसाठी नवीन स्मार्ट वेपन खरेदी करण्याची योजना आहे. फ्रेंच बनावटीच्या या नव्या शस्त्रामुळे विमानाच्या कॉकपीटमध्ये बसलेल्या वैमानिकाला जमिनीवर असणाऱ्या ६० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अत्यंत अचूकतेने वेध घेता येईल.

आणखी वाचा- चीनच्या स्टेल्थ J-20, पाकच्या F-16 पेक्षा राफेलच सरस, कसं ते समजून घ्या…

चीन बरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हॅमरची खरेदी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. इंडियन एअर फोर्स राफेलसाठी हॅमर (हायली एजाइल मॉड्यूलर म्यूनिशन एक्सटेंडेड रेंज) हे नवीन स्मार्ट वेपन खरेदी करण्याची तयारी करत आहे.

आणखी वाचा- …तर पाकिस्तानच्या F16 चा खात्मा होणारच, जाणून घ्या ‘राफेल’मधील ‘मिटिऑर’ची वैशिष्ट्ये

पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तिन्ही सैन्य दलांना इमर्जन्सीमध्ये शस्त्रास्त्र खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत. त्या अंतर्गत हॅमरची खरेदी करण्यात येईल. हॅमर हा एक ‘गायडन्स किट’ आहे. म्हणजे ज्याला मार्गदर्शक म्हणता येईल. या किटमध्ये Mk80 सीरीजचे बॉम्ब वापरावे लागतील.

आणखी वाचा- आठ विमानांचं काम एकटं ‘राफेल’ करेल, नाक आणि छोटया चेंडूमध्ये आहे ‘सिक्रेट’

फ्रान्सची डिफेन्स कंपनी साफरानकडून हॅमरची किटची निर्मिती केली जाते. हॅमर विकत घेतल्यानंतर आपल्याला Mk80 सीरीजचे बॉम्ब आयात करावे लागतील. भारतातही नंतर या बॉम्बचे उत्पादन होऊ शकते असे दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले. भारताने मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकच्यावेळी स्पाइस २००० बॉम्बचा वापर केला होता.

आणखी वाचा- २२ वर्षांनी हवाई दलाला मिळालेल्या जेटचा असा होता प्रवास

हॅमर सुद्धा स्पाइस सारखाच स्मार्ट बॉम्ब आहे. भारताने दोन ते तीन वर्षांपूर्वीच हॅमर स्मार्ट बॉम्बची खरेदी करण्यासाठी बोलणी सुरु केली होती. शत्रूच्या टप्प्यात न येता शत्रूच्या प्रदेशातील खोलवर भागातील लक्ष्याचा अत्यंत अचूकतेने वेध घेता येतो. डोंगराळ भागासह कुठल्याही भागातील शत्रूने बनवलेले मजूबत बंकर हॅमर बॉम्बने उद्धवस्त करता येतील. सध्या पूर्व लडाखमध्ये जो, तणाव निर्माण झालाय तो उंच पर्वतीय भाग आहे.