24 September 2020

News Flash

पाकिस्तानी सैन्याने फेकलेले ९ ‘मोर्टार शेल’ भारतीय जवानांकडून निष्प्रभ

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, शस्त्रसंधीचे उल्लंघन कायम

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून फेकण्यात आलेले ९ मोर्टार शेल भारतीय जवानांनी निष्प्रभ केले आहेत. हे सर्व मोर्टार बालाकोट, बसोनी आणि संडोट या गावांच्या परिसरात फेकण्यात आले होते. सातत्याने पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारादरम्यान हे मोर्टार शेल भारतीय हद्दीत येऊन पडले होते.

हे सर्व मोर्टार शेल भारतीय सीमेत येऊन पडल्यावर त्यांचा स्फोट झाला नव्हता, मात्र त्यांचा स्फोट होण्याची शक्यता होती. तत्पूर्वीच भारतीय जवानांनी हे सर्व मोर्टार निष्प्रभ केले. हे सर्व मोर्टार शेल १२० एमएम आकाराचे होते.

या अगोदर कठुआ जिल्ह्यातील हिरानगर येथील सीमा परिसर अशांत होता. पाकिस्तानकडून बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्यासुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारताच्या दोन चौक्यांवर हल्ला केला होता. यानंतर सकाळी साडेदहा व दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन मोर्टार फेकले होते. यामुळे परिस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

पाकिस्तान एलओसीवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. भारतीय सेनेकडून दावा करण्यात आलेला आहे की, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सीमारेषेजवळील पाकिस्तानी चौक्यांजवळ पाकिस्तानचे एसएसजी कमांडो आढळले होते. तसेच पुंछ जिल्ह्यातील केजी सेक्टरमधील पुलस्त नदी परिसरातील एका चौकीजवळही काही पाकिस्तानी एसएसजी कमांडो दिसले होते, तेव्हा त्यांना पिटाळून लावण्यात आले होते. घटनास्थळी काही अद्यावत सामान देखील आढळून आले शिवाय एका गुप्त कॅमेऱ्यातही या पाकिस्तानी कंमांडोची छायाचित्रं दिसली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 4:32 pm

Web Title: indian army destroyed 9 live mortar shells msr 87
Next Stories
1 मतांसाठी शरद पवारांनी काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार करणं दुर्दैवी – नरेंद्र मोदी
2 ममता बॅनर्जींनी या खास कारणांसाठी प्रथमच घेतली गृहमंत्र्यांची भेट!
3 “इम्रान खान, तुम्ही कटोरा घेऊन जगभरात भीक मागायला सुरुवात करा”
Just Now!
X