News Flash

आत्मनिर्भर भारत : भारतीय लष्करानं लाँच केलं व्हॉट्सअ‍ॅपसारखं मेसेजिंग अ‍ॅप

संरक्षण मंत्रालयानं दिली माहिती

प्रातिनिधिक फोटो

आत्मनिर्भर भारत या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्करानं व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणेच एक नवं अ‍ॅप विकसित केलं आहे. लष्करानं विकसित केलेल्या या अ‍ॅपला ‘सिक्युअर अ‍ॅप्लिकेशन फॉर द इंटरनेट’ (SAI) असं नाव देण्यात आलं आहे. हे अ‍ॅप इंटरनेटद्वारे अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एन्ड टू एन्ड सुरक्षित वॉईस कॉल, संदेश पाठवणं आणि व्हिडीओ कॉलिंगसारख्या सुविधा देतं. गुरुवारी संरक्षण मंत्रालयानं यासंदर्भातील माहिती दिली.

“लष्कराद्वारे विकसित करण्यात आलेलं हे अ‍ॅप कमर्शिअल मेसेजिंग अ‍ॅप टेलिग्राम, संवाद यांच्यासारखंच आहे. हे एन्ड टू एन्ड इनक्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करतं. साई लोकल इन हाऊस सर्व्हर आणि कोडिंगसोबतच सुरक्षेच्या फीचर्सच्या बाबतीत इतर अ‍ॅप पेक्षा उत्तम आहे. त्यांना आवश्यकतेनुसार बदलणंदेखील शक्य आहे,” असं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं.

संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार या अ‍ॅपची CERT-in आणि आर्मी सायबर ग्रुपच्या पॅनलद्वारे चाचणी घेण्यात आली आहे. दरम्यान, एनआयसीवर इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या फायलिंगवरही काम सुरू आहे. याव्यतिरिक्त हे अ‍ॅप iOS प्लॅटफॉर्मवरही आणण्याचं काम सुरू आहे. “साई हे अ‍ॅप संपूर्ण लष्कराद्वारे वापरलं जाणार आहे जेणेकरून या सेवेसह सुरक्षित संदेशांच्या देवाणघेवाणीची सुरूवात होऊ शकेल,” असंही संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 3:56 pm

Web Title: indian army developed new messaging app sai like whatsapp for android safe and secure jud 87
Next Stories
1 Coronavirus: विमान प्रवासापेक्षा किराणामाल खरेदी, हॉटेलिंगदरम्यान संसर्गाचा धोका अधिक
2 दिल्लीत करोनाची तिसरी लाट?; आरोग्यमंत्री म्हणतात, आता मास्कलाच समजा लस
3 Bihar Election : ब्रिटनच्या पंतप्रधानांपेक्षाही काही उमेदवारांकडे आहे अधिक संपत्ती
Just Now!
X