News Flash

भारतीय सैन्याने नेपाळ सैन्याला १ लाख कोविड -१९ प्रतिबंधक लसी दान केल्या

चीनने सोमवारी नेपाळला ८ लाख कोविड -१९ प्रतिबंधक लसींचे दान केले

द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यासाठी दोन शेजारी राष्ट्रांच्या सैन्यदलाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय लष्कराने नेपाळ लष्कराला भारत-निर्मित कोविड -१९ विरोधी लसाींचे एक लाख डोस भेट म्हणून दिले आहेत.

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी रविवारी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेपाळ सैन्य दलाच्या सैनिकांना या लसी दिल्या, असे भारतीय दूतावासाने ट्विट केले.
नेपाळच्या आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन कामगारांच्या तत्काळ आवश्यकतेसाठी भारताने यापूर्वी ‘मेड इन इंडिया’ कोविड – १९ प्रतिबंधक दहा दशलक्ष लसी नेपाळला भेट दिल्या आहेत. दरम्यान, चीनने सोमवारी नेपाळला ८ लाख अँटी-कोविड -१९ लसींचे दान केले, अशी माहिती येथील मीडियाच्या वृत्तानुसार देण्यात आली.

हिमालयन टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या वेरो सेलच्या लसी नेपाळमधील चिनी राजदूत होया यांकी यांनी आरोग्य आणि लोकसंख्या मंत्री हृदयेश त्रिपाठी यांना या कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या समारंभात दिल्या.
राज्य-समर्थित फार्मास्युटिकल कंपनी सिनोफर्म यांनी ही लस विकसित केली आहे.

नेपाळच्या आरोग्य व लोकसंख्या मंत्रालयाच्या अंतर्गत औषध प्रशासन विभागाने चीनमध्ये बनविलेल्या ‘वेरो सेल’ या लसीला कोव्हिड -१९ विरूद्ध आपत्कालीन वापरासाठी नेपाळमध्ये १७ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली होती.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशिल्ड लसींच्या खरेदीस उशीर केल्यामुळे नेपाळने सध्या सुरू असलेल्या कोविड -१९ लसीकरण मोहिमेला स्थगिती दिली आहे, अशी माहिती माय रिपब्लिका या न्यूज पोर्टलने दिली आहे.

काठमांडू पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळने १५ मार्चपर्यंत दोन टप्प्यांत १.७ दशलक्षांहून अधिक लोकांना रोगप्रतिबंधक लस दिल्यानंतर त्यांचे लसीकरण अभियान स्थगित केले आहे. नेपाळमध्ये कोरोनाव्हायरसचे २,७६,८३९ प्रकरणे आहेत आणि या आजाराशी संबंधित ३,०२७ मृत्यूंची नोंद झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 7:07 pm

Web Title: indian army donates 1 lakh doses covid 19 vaccines to nepal army under vaccine maitri sbi 84
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांचे अश्रू आणि द्रमुक नेत्याचा माफीनामा! तमिळनाडू निवडणुकीत घडतंय काय?
2 बंगालमध्ये भाजपाशासित राज्यांमधून सशस्त्र सेना तैनात करू नका, टीएमसीची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती
3 जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये नगरपालिका कार्यालयावर दहशतवादी हल्ला; दोघांचा मृत्यू
Just Now!
X