News Flash

भारतीय लष्कराकडे दारूगोळ्याची कमतरता

भारतीय लष्कराला दारूगोळ्याची कमतरता भासत असल्याची कबुली लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे

| July 27, 2015 02:01 am

बोफोर्स तोफांमध्ये सुधारणा करत भारतीय तंत्रज्ञांनी बनवली नवी तोफ (फोटो: सीमेवर तैनात बोफोर्स तोफ)

भारतीय लष्कराला दारूगोळ्याची कमतरता भासत असल्याची कबुली लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र सरकारला या बाबीची कल्पना असून त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लष्कराकडे दारूगोळ्याची कमतरता असल्याचा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला आहे आणि ही बाब एका विशिष्ट सीमेशी जोडली जाऊ नये. भारतीय सैन्यात शस्त्रास्त्रे सामायिक असून, काही दारूगोळ्यांची कमतरता आहे. हा साठा भरून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे प्रमुख ले.ज. डी. एस. हुडा यांनी पत्रकारांना सांगितले.
दारूगोळ्याच्या कमरतेमुळे लष्कराच्या दैनंदिन मोहिमांवर काही परिणाम होत नाही. तेवढय़ा प्रमाणात दारूगोळा आपल्याकडे उपलब्ध आहे. तथापि युद्धजन्य परिस्थितीत फार मोठा साठा तयार असायला हवा. संरक्षण मंत्रालयाला याची कल्पना असून हा प्रश्न सोडवण्याचे ते प्रयत्न करीत आहेत, असे हुडा म्हणाले.
आपल्या सैनिकांच्या गरजांची लष्कराला कल्पना असून, त्याबाबत आम्ही संवेदनशील असल्याचेही हुडा यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 2:01 am

Web Title: indian army face shortage of ammunition
टॅग : Indian Army
Next Stories
1 व्यापम घोटाळ्यातील जागल्याच्या कुटुंबाचा पोलिसांकडून छळ? 
2 रुग्णांना पैसे नसतानाही  पहिले ५० तास उपचार
3 ‘एक श्रेणी, एक वेतन’साठी देशभर जागृती 
Just Now!
X