News Flash

सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापतींचा पुरावा भारताकडून उघड

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात केरन सेक्टरमधील घुसखोर दहशतवाद्यांवरील कारवाईचा व्हिडिओ सादर

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी पाठबळ देत असल्याचे जगजाहीर असतानाही पाकिस्तानकडून सातत्याने हे नाकारण्यात आलेले आहे. कितेकदा याबाबत पाकिस्तानाला जगासमोर तोंडघशी देखील पडावे लागले आहे. मात्र तरीही आपल्या कुरापती सुरूच ठेवणाऱ्या पाकिस्तानच्या नापाक कारवायांचा पुरावाच भारतीय सेनेकडून उघड करण्यात आला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात घुसखोरीचा प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचा व्हिडिओ भारतीय सेनेने जारी केला आहे.

पाकिस्तान सातत्याने भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात असतो. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देखील पाकिस्तानकडून अशाचप्रकारे घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. पाकिस्तानी सेना बॉर्डर अ‍ॅक्शन टीमद्वारे भारतात दहशतवाद्यांना घुसवण्याच्या प्रयत्नात होती. मात्र, भारतीय सेनेने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला एवढेच नाहीतर चार ते पाच दहशतवाद्यांचा खात्मा देखील करण्यात आला होता. या कारवाईचा एक व्हिडिओ भारतीय सेनेकडून जारी करण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये एलओसीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. जो भारतीय सेनेने उधळून लावला होता. यात चार ते पाच दहशतवाद्यांचा खात्माही करण्याता आला होता.

काही दिवसांपासून पाकिस्तान एलओसीवर सातत्याने कारवाया करत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सेना अधिकच सज्ज झालेली आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या सर्व हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. तर दहशतवादी कारवायांची देखील शक्यता वर्तवण्यात आल्याने सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 6:55 pm

Web Title: indian army foiled an infiltration attempt by a pakistani bat squad msr 87
Next Stories
1 देशाबाहेर आम्ही एकत्र, पाकिस्तानला एक इंचही जागा देणार नाही – थरुर
2 दक्षिण भारतावर दहशतवादी हल्ल्याचे सावट – लेफ्टनंट जनरल सैनी
3 मारुति, हीरोमागोमाग अशोक लेलँडमध्येही उत्पादन कपातीचा निर्णय
Just Now!
X