जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेला सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (आफस्पा) आणि अशांत क्षेत्र कायदा (डीएए) हे दोन कायदे रद्द केल्यास सुरक्षा दलांनी बंडखोरी व घुसखोरी यांचे प्रमाण खाली आणण्यात मिळवलेले यश वेगाने घसरू शकते असे सांगून, हे कायदे रद्द करण्याच्या कुठल्याही प्रयत्नांना लष्कराने विरोध दर्शवला आहे.
काश्मीरमध्ये आफस्पा व डीएए हे दोन्ही कायदे काश्मीरला लागू करणे आपण सुरूच ठेवायला हवे, असे वेस्टर्न कमांडचे कमांड अधिकारी लेफ्टनंट जनरल के.जे. सिंग यांनी पत्रकारांना सांगितले. जम्मू-काश्मीरमधील काही राजकीय पक्ष आफस्पाची मागणी करीत असल्याबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
सध्याच्या पाश्र्वभूमीवर, अशांत असलेल्या क्षेत्रात ‘डिस्टर्ब्ड एरिया अ‍ॅक्ट’ लागू केला जातो आणि त्यामुळे आपोआपच ‘आफस्पा’ही तेथे लागू होतो हे आपण समजून घेण्याची गरज असल्याचे ले.ज. सिंग म्हणाले.
काश्मीरमधील घुसखोरीचे प्रमाण कमी झाले असून तेथील बंडखोरीचा स्तरही आम्ही खाली आणला आहे.