सेनादलांच्या अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर त्यांचे पद नावाआधी राखता येणार आहे, पण पदानंतर कंसातील निवृत्त हा शब्द आता नावानंतर वापरावा लागणार आहे.
लष्कराच्या मुख्यालयाने २१ जुलैला तसे परिपत्रक काढले आहे. लष्करी अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींनी पद बहाल केले असते. निवृत्तीनंतर ते कायम ठेवण्याचा विशेषाधिकारही त्यांना घटनेने बहाल केला आहे. मात्र पद कधीच निवृत्त होत नसल्याने आजवर चुकीच्या पद्धतीने लिहिले जाणारे नाव आता नव्या निर्देशानुसार लिहावे लागणार आहे.
याआधी समजा ‘अबक’ हे ब्रिगेडियर पदावरून निवृत्त झाले तर ते आपले नाव ‘ब्रिगेडियर (निवृत्त) अबक’ असे लिहीत असत. आता हे नाव नव्या निर्देशानुसार ‘ब्रिगेडियर अबक (निवृत्त)’ असे लिहावे लागणार आहे.