News Flash

Indian Army destroys Pakistani checkposts: भारताने बदला घेतला! क्षेपणास्त्र डागून पाकच्या चौक्या उद्ध्वस्त

भारतीय सैन्याकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले.

Indian army flattened Pakistan post along LOC : भारतीय सैन्याकडून या कारवाईचा एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या घृणास्पद कृत्याचा भारतीय लष्कराने सोमवारी बदला घेतला. जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये सोमवारी सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याकडून पाकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. ‘टाईम्स नाऊ’च्या माहितीनुसार भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत पाकच्या सीमारेषेवरील चौक्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी भारताने अँटी टँक गायडेड मिसाईल्सचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्याकडून या कारवाईचा एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओत भारतीय लष्कराने पाकिस्तानी चौक्यांवर तब्बल सात क्षेपणास्त्रे डागल्याचे दिसत आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी बंकर्स पूर्णपणे उद्धस्त झाल्याचेही दिसत आहे.

या महिन्यात पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. १ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर उखळी तोफांचा जोरदार मारा केला होता. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले होते. यावेळी पाकने शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली होती. पाकच्या कृतीमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. शत्रूंच्या या अमानवी कृत्याला सडेतोड उत्तर देऊ, असा थेट इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी दिला होता.
पाकिस्तानने भारताचा हा आरोप फेटाळला असला तरी पाकच्या नृशंस कृत्याचे पुरावे सापडल्याचा दावा भारताने केला होता. पूंछ जिल्ह्य़ातील कृष्णा घाटी क्षेत्रात नियंत्रण सीमा ओलांडून पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांवर हल्ला केला. त्यापाठोपाठ पाक सैनिकांना संरक्षण देण्यासाठी पाकिस्तानी चौक्यांमधून गोळीबार करण्यात आला. शहीद झालेल्या दोन भारतीय जवानांचे रक्ताचे नमुने हे घटनास्थळी घेतलेल्या रक्ताच्या नमुन्याशी जुळत असल्याने पाकच्या हल्लेखोर सैनिकांनी नियंत्रण रेषा पार करून हे क्रूर कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 10:24 am

Web Title: indian army take revenge attacked and flattened pakistan post along line of control loc in 60 seconds by indian army
Next Stories
1 French Presidential Election 2017: इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे नवे अध्यक्ष; मेरी ल पेन यांच्यावर दणदणीत विजय
2 Pravin togadia: मोदी सरकारच्या काळात सीमेवरचा जवान सुरक्षित नाही, गावातील शेतकरीही सुखी नाहीत – प्रवीण तोगडिया
3 VIDEO : भाजप आमदाराने झापल्याने महिला पोलिसाला अश्रू अनावर
Just Now!
X