22 January 2021

News Flash

पाकिस्तानी दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्र तस्करीचा प्रयत्न; भारतीय लष्कराने उधळला डाव

दहशतवाद्यांकडून चार एके-४७, आठ मॅगझिन्स आणि २४० एके रायफल जप्त

पाकिस्तानी दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून हे दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांकडून चार एके-४७, आठ मॅगझिन्स आणि २४० एके रायफल जप्त केल्या आहेत.

लष्कराला केरन सेक्टरमध्ये किशन गंगा नदी पात्रात काही हालचाली सुरु असल्याचं दिसलं होतं. यानंतर लगेचच जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम सुरु करण्यात आली. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दहशतवादी दोरीच्या सहाय्याने ट्यूबमधून नदीपलीकडे नेत असल्याचं लक्षात आलं. यानंतर तात्काळ कारवाई करत शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

“यावर्षी मोठ्या प्रमाणात घुसखोरी रोखण्यात भारतीय लष्कराला यश मिळालं आहे. गेल्यावर्षी १३० वेळा प्रयत्न झाला होता, यावेळी ही संख्या ३० ने कमी झाली आहे. यामुळे देशांतर्गत परिस्थिती सुधारण्यास मदत मिळेल,” असा विश्वास लेफ्टनंट जनरल बी एस राजू यांनी व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- कुलगामध्ये जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, “आमच्या सतर्क जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पाकिस्तानचा हेतू अद्यापही बदललेला नाही हे स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत त्यांचा हेतू कायम आहे तोपर्यंत आम्ही लढा देत राहू,” असं ते म्हणाले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “गुप्तचर यंत्रणांनुसार, पाकिस्तानमध्ये लॉँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी आहेत. वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करुनही त्यांना रोखण्यात आम्हाला यश आलं आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 12:41 pm

Web Title: indian army thwarts attempts by terrorists to smuggle weapons sgy 87
Next Stories
1 चीन लोकशाहीसाठी गंभीर आव्हान; भारतासोबत संघर्ष मोठं उदाहरण : तैवान
2 कंगनाविरोधात FIR दाखल करा; कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
3 ४५ यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस उलटली
Just Now!
X