News Flash

चीन-पाकिस्तानवर अचूक वार करण्यासाठी भारत इस्रायलकडून घेणार रणगाडा उडवणारे ‘स्पाइक मिसाइल’

सर्वात घातक मिसाइल...

भारतीय लष्कर लवकरच इस्रायलकडून रणगाडा विरोधी स्पाइक क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे. चीन-पाकिस्तान विरोधात सीमेवरील आपली क्षमता वाढवण्यासाठी ही खरेदी करण्यात येणार आहे. भारतीय लष्कराकडून स्पाइक क्षेपणास्त्राची ही दुसरी ऑर्डर इस्रायलला देण्यात येणार आहे.

“नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेल्या तुकडयांसाठी १२ स्पाइक लाँचर्स आणि २०० क्षेपणास्त्र खरेदी करण्यासंबंधीचा प्रस्ताव लष्कराने मांडला आहे. लष्कराला आपातकालीन प्रसंगात खरेदीचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्या अंतर्गत ही खरेदी करण्यात येणार आहे” लष्करातील सूत्रांनी इंडिया टुडेला ही माहिती दिली आहे.

मागच्यावर्षी बालाकोट एअर स्ट्राइकनंतर सरकारने विशेष खरेदीचे अधिकार दिले होते. त्यावेळी सुद्धा इतक्याच संख्येने लाँचर्स आणि क्षेपणास्त्रे खरेदी करण्यात आली. लष्कराने पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर ही स्पाइक क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. आता नवीन खरेदी करण्यात येणारी क्षेपणास्त्र चीनला लागून असलेल्या सीमेवर तैनात करण्यात येतील.

सध्या भारत आणि चीनमध्ये तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ चीननेही आपले रणगाडे तैनात केले आहेत. युद्धाच्या तयारीसाठी तात्काळ ५०० कोटी रुपयापर्यंत खरेदी करण्याचे अधिकार सरकारने तिन्ही सैन्य दलांना दिले आहेत. याच निधीचा वापर करुन लष्कर अमेरिकेकडूनही काही युद्धसाहित्याची खरेदी करणार आहे. एअर फोर्सही इस्रायलकडून यूएव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहे.

बंकर फोडणारे स्पाइस-२००० बॉम्ब
भारताची स्पाइस २००० बॉम्ब खरेदी करण्याची योजना आहे. स्पाइस बॉम्बमध्ये जमिनीवरील टार्गेटसचा अत्यंत अचूकतेने वेध घेण्याची क्षमता आहे. या बॉम्बच्या खरेदीमुळे भारताच्या ताकतीमध्ये आणखी वाढ होईल. मागच्यावर्षी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक करण्यात आला होता. हा तळ स्पाइस २००० बॉम्बने नष्ट करण्यात आला होता. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

एअर फोर्ससाठी हे बॉम्ब खरेदी करण्यात येणार आहेत. चीन बरोबर वाद सुरु असताना सैन्यदलांना तात्काळ खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. एअरफोर्सकडे स्पाइस २००० बॉम्ब आहेत. पण आता आणखी असे बॉम्ब खरेदी करण्याचा विचार आहे. भारताकडे उपलब्ध असलेल्या स्पाइस बॉम्बच्या नव्या आवृत्तीमध्ये ७० किमीच्या परिघातील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याबरोबर बंकर उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 1:54 pm

Web Title: indian army to buy spike anti tank missiles from israel dmp 82
Next Stories
1 आत्मनिर्भर भारत: केंद्र सरकारनं लाँच केलं जगातलं सगळ्यात स्वस्त करोना टेस्ट किट
2 सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, पुणे विभाग टॉप ५ मध्ये
3 “सर्वांनी सचिन पायलट यांचे आभार मानायला हवेत”; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निर्णयावर भाजपाची टीका
Just Now!
X