19 February 2020

News Flash

अरुणाचल प्रदेश : चीन सीमेवर प्रथमच भारतीय लष्कर करणार मोठा युद्धाअभ्यास

पाच हजार जवानांसह वायुसेनेचाही असणार सहभाग

भारतीय लष्कराकडून वायुसेनेबरोबर चीनच्या सीमेवर ऑक्टोबर महिन्यात मोठा युद्धाअभ्यास केला जाणार आहे. भारतीय सेनेच्या एकमेव ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’चे पाच हजार जवान अरूणाचल प्रदेशात होणाऱ्या या मोठ्याप्रमाणावरील युद्धाअभ्यासात सहभागी होणार आहेत. चीनच्या सीमेवर भारतीय सेनेचा हा पहिलाच युद्धाअभ्यास असणार आहे. या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जवानांना तैनात केले जाणार आहे.

यासाठी नवनिर्मित ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ कडून पाच ते सहा महिन्यांपासून ईस्टर्न कमांड अंतर्गत तयारी केली जात आहे. सेनेच्या सुत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार युद्धाअभ्यासात तेजपूरमधील 4 कोर तुकड्यांना सेनेच्या रक्षणासाठी एका अतिउच्च ठिकाणी तैनात केले जाणार आहे. यामध्ये ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ च्या अडीच हजारपेक्षा जास्त जवानांना वायुसेना युद्धाअभ्यासासाठी एअरलिफ्ट करणार आहे. या युद्धाअभ्यासादरम्यान स्ट्राइक कोरचे जवान, 4 कोरच्या जवानांवर हवाई हल्ला करणार आहेत.

या युद्धाअभ्यासासाठी वायुसेना पश्चिम बंगालमधील बगदोगरा येथून सैनिकांना एअरलिफ्ट करणार आहे. यासाठी वायुसेना सी-17 ग्लोबमास्टर, सी-130 जे सुपर हरक्युलिस आणि एएन-32 या विमानांचा वापर करणार आहे. ज्यामुळे लवकरात लवकर युद्ध क्षेत्राच्या ठिकाणी सैन्य तैनात करता येणार आहे.

याशिवाय या युद्धाअभ्यासात ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ च्या हॉवित्झर तोफांबरोबर रणगाडे आणि लष्कराच्या लढाऊ तुकड्यांचा शस्त्रसज्जतेसह समावेश असणार आहे. या युद्धाअभ्यासाचे आयोजन चीन बरोबर पर्वतीय क्षेत्रात युद्धासाठी ’17 – माउंटन स्ट्राइक कोर’ ला अधिक सक्षम बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

First Published on September 11, 2019 3:43 pm

Web Title: indian army troops along with air force will carry out a massive war game in arunachal pradesh msr 87
Next Stories
1 45 लाखांचे कर्ज त्यात जुगारात 47 लाख गमावले, रक्कम फेडण्यासाठी केला घोटाळा
2 स्वामी चिन्मयानंद यांचा निर्वस्त्र मसाज घेतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल
3 ‘विक्रम लँडर’ची लढाई उणे २०० तापमानाशी; पुढील दहा दिवसांमध्ये संपर्क झाला नाही तर…
Just Now!
X