भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारस पाकिस्तानमधील बालाकोट भागातील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर १००० किलो वजनाचा बॉम्ब फेकल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज २००० विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर भारतीय सैन्य दलाने ऑल वेज रेडी म्हणजेच कायम तयार आहोत अशा अर्थाचे एक ट्विट केले आहे.
#IndianArmy आणि #NationFirst हे हॅशटॅग वापरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये बंदूक रोखलेल्या एका भारतीय जवानाचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. या ट्विटबरोबर पोस्ट करण्यात आलेली कवितेची कडवी ही ही निबंधकार रामधारी सिंह यांच्या कवितेमधील आहेत. भारतीय लष्कराने ट्विट केलेल्या कवितेच्या ओळी आहेत,
‘क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुए विनीत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।
सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की,
सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।’
‘क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुए विनीत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की,
सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।’#IndianArmy#AlwaysReady pic.twitter.com/bUV1DmeNkL— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) February 26, 2019
या ट्विटमधील पहिल्या कडव्यामधून तुम्ही माणुसकी म्हणून एखाद्याला जेवढ्या वेळा माफ कराल तेवढ्या वेळा तो तुम्हाला दुर्बल समजेल. यासाठी कौरवांचा दाखला कवीने दिला आहे.
दुसऱ्या कडव्यामध्ये प्रभू रामाचा संदर्भ कवीने दिला आहे. सुमद्र ओलांडण्यासाठी प्रभू रामांनी जवळजवळ तीन दिवस त्याच्याकडे गोड शब्दांमध्ये मला लंकेपर्यंतचा मार्ग करुन दे अशा आशयाची विनंती केली. पण तो काही मान्य झाला नाही. त्यावेळी जेव्हा प्रभू रामांनी उत्तर दिले तेव्हा समुद्राने काहीच विरोध केला आहे. रागाची एक शलाका रामामध्ये दिसली आणि समुद्र मनुष्य रुपाने रामाला शरण आला.
या कवितेच्या दोन कडव्यांवरुन भारतीय लष्कराने अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला सुनावले आहे. अनेकदा माफ करुनही योग्य समज येत नसल्याने अखेर पाकिस्तानला हिसका दाखवावाच लागला अशा आशयाचा अर्थ या कवितेमध्ये दडला असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 26, 2019 11:41 am