News Flash

Video : पाकिस्तानच्या तीन उखळी तोफा भारतीय लष्करानं केल्या नष्ट

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच उल्लंघन

शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्ताननं भारतीय लष्कराच्या चौक्यावर उखळी तोफांसह गोळीबार केला होता. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर जम्मू काश्मीरातील करमरा गावात तीन जिवंत उखळी तोफा सापडल्या होत्या. त्या भारतीय लष्कराकडून नष्ट करण्यात आल्या आहेत. उखळी तोफा नष्ट करतानाचा एक व्हिडीओ ‘एएनआय’ने जारी केला आहे.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. जम्मू काश्मीरातील कलम ३७० रद्द केल्यापासून शस्त्रसंधी उधळून लावण्याच्या घटना सातत्यानं होत असून, पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचेही प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, रविवारी पाकिस्तानकडून सीमेवर आगळीक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, भारतीय लष्करानं जबरदस्त कारवाई करत पाकला उत्तर दिलं.

या कारवाई दरम्यान, दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. यात जम्मू काश्मीरमधील करमरा गावात तीन पाकिस्तानी उखळी तोफा आढळून आल्या होत्या. याची माहिती लष्कराला देण्यात आली. त्यानंतर जवानांनी या तोफा नष्ट केल्या. या उखळी तोफा नष्ट करतानाचा व्हिडीओ तयार करण्यात आला असून, ‘एएनआय’नं तो प्रसिद्ध केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 11:58 am

Web Title: indian army yesterday destroyed 3 mortar shells of pakistan bmh 90
Next Stories
1 नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट
2 INX Media Case : जामीन मिळूनही चिदंबरम यांना राहावं लागणार कोठडीत!
3 एअर इंडियाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होणार; पुढील महिन्यात निविदा मागवणार?
Just Now!
X