News Flash

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक जवान शहीद

चार जवान जखमी, सीमेलगतच्या गावांनाही केले जात आहे लक्ष्य

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानी सेनेने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पूंछमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये गोळीबार केला. यामध्ये रवि रंजन कुमार सिंह हे शहीद झाले. तर अन्य चार जवानही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

यावेळी पाकिस्तानकडून सीमा रेषेजवळ असलेल्या चौक्यांना लक्ष्य केले गेले. शिवाय सीमेलगतच्या गावांवर देखील उखळी तोफांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ ए रद्द केले. या निर्णयाने पाकिस्तानला जोरदार झटका बसला असून, त्यानंतर मिळेल त्या मार्गाने रोष व्यक्त करणे पाकने सुरू केले आहे.

या अगोदर पाकिस्तानी सेनेकडून रविवारी पुंछ जिल्ह्यातील मेंढर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. एवढेच नाहीतर सीमेलगतच्या गावांवर उखळी तोफांचाही मार केला होता. ज्यामध्ये एक दहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली होती. तसेच स्वातंत्र्यदिनीही पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 5:15 pm

Web Title: indian armys naik ravi ranjan kumar singh lost his life in ceasefire violation by pakistan army msr 87
Next Stories
1 जम्मू-काश्मीरमधील नेत्यांच्या सुटकेसाठी विरोधकांचे दिल्लीत निषेध आंदोलन
2 “इतक्या जुन्या गाडया कोणीही चालवत नाही”, मिग-२१ विमानांवर एअर फोर्स प्रमुखांची खंत
3 धक्कादायक! रुग्णालयाच्या कॉरिडोअरमध्ये महिलेची प्रसूती, मदत करण्याऐवजी लोक पाहत राहिले
Just Now!
X