News Flash

मिनोती आपटे यांना ऑस्ट्रेलियात पुरस्कार

मूळच्या पुण्याच्या व आता ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या डॉ. मिनोती विवेक आपटे यांना वैद्यक संशोधनासाठी न्यू साउथ वेल्सचा वूमन ऑफ द ईयर २०१५ हा पुरस्कार प्रदान

| March 18, 2015 12:37 pm

मूळच्या पुण्याच्या व आता ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या डॉ. मिनोती विवेक आपटे यांना वैद्यक संशोधनासाठी न्यू साउथ वेल्सचा वूमन ऑफ द ईयर २०१५ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मिनोती  या न्यू साऊथ वेल्स विद्यापीठात संशोधक असून राज्याचे मुख्यमंत्री माईक बेअर्ड व महिला विकास मंत्री प्रू गोवार्ड यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. न्यू साऊथ वेल्सच्या साऊथ वेस्टर्न सिडनी क्लिनिकल स्कूलमध्ये त्या प्राध्यापक आहेत. त्यांना यापूर्वी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पदक मिळालेले आहे.     पुणे विद्यापीठातून त्या एमबीबीएस झालेल्या असून ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर त्यांनी स्वादुपिंडाच्या कर्करोगावर विशेष संशोधन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 12:37 pm

Web Title: indian cancer researcher wins woman of the year award in australia
Next Stories
1 जाट समाजाचे ओबीसी आरक्षण रद्द
2 एसी नको असेल तर बंद ठेवा, केजरीवालांची मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याने फेटाळली
3 संचालक निवडीवरून आयआयटी आणि मनुष्यविकास मंत्रालयात मतभेद, डॉ. अनिल काकोडकरांचा राजीनामा
Just Now!
X