24 November 2020

News Flash

भारत चीन सीमेवर तणाव; दोन्ही बाजूचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग रेंजमध्ये

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरु

संग्रहित (Photo: India Today)

पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात नियंत्रण रेषेवर भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. चीनकडून घुसखोरी करून नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. दरम्यान चिनी लष्कराने केलेल्या या प्रयत्नामध्ये भारतीय लष्कराला येथील महत्वाच्या भूप्रदेशावर ताबा मिळवण्यात यश आलं आहे. यामुळे दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये सध्या तणाव आहे.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरु असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहनं कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.

…तर भारताची १९६२ पेक्षा जास्त मोठी हानी करू, चीनची धमकी
…म्हणूनच नियंत्रण रेषेवरुन भारतासोबत वाद, चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितलं कारण

चीनकडून जड आणि तसंच हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्यात आले असून भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसोबत पूर्णपणे सुसज्ज आहेत. कालाटोप भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात असून इतर ठिकाणीही लष्करी तुकड्या तैनात असल्याने चिनी रणगाडे आणि वाहनांची हालचाल सध्या थांबली आहे.

यादरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सध्या ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरु आहे. सकाळी ९ वाजल्यापासून या चर्चेला सुरुवात झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 1:17 pm

Web Title: indian chinese tanks within firing distance after tension over line of actual control in pangong lake eastern ladakh sgy 87
Next Stories
1 सुरेश रैनावर संकटांचा डोंगर, काकांच्या मृत्यूनंतर चुलत भावाचंही निधन
2 कर्जफेड स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती
3 खऱ्या मित्राच्या सन्मानार्थ बांगलादेशनं जाहीर केला राष्ट्रीय दुखवटा; प्रणव मुखर्जींना दिली मानवंदना
Just Now!
X