वैमानिकांनाही वन रँक वन पे लागू करा अशी मागणी करत इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशनने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना एक पत्र लिहिलं आहे. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या मुद्द्याकडे आंधळेपणाने दुर्लक्ष केले जाते आहे असाही आरोप या पत्रात करण्यात आला आहे. वन रँक वन पेन्शन लागू केल्यास एअर इंडियाची विदेशी चलनाची प्रचंड बचत होऊ शकते. सध्या सरकारी विमान कंपनीला मोठ्या प्रमाणावर विदेशी चलनास मुकावे लागत आहे. असं असतानाही वरीष्ठ पातळीवर आमच्या मागणीची दखल का घेतली जात नाही असा प्रश्न पायलट असोसिएशनने नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना विचारला आहे.

गेल्या वर्षीही ऑक्टोबर महिन्यात आम्ही वन रँक वन पेची मागणी केली होती. नागरी उड्डाण मंत्रालयाकडे आम्ही यासंदर्भातला प्रस्ताव पाठवला होता. तरीही त्या प्रस्तावाला मंजुरी अद्यापही देण्यात आलेली एमओसीएने २०१६ मध्ये वेतन आणि भत्ते यांच्याबाबत देण्यात आलेले निवेदन स्वीकारले नाही. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले होते की वेतनासंदर्भातले बदल एअर इंडियाच्या वैमिनिकांबाबतही लागू केले जातील. तरीही ते बदल करण्यात आलेले नाहीत असे आयसीपीएने म्हटले आहे.