News Flash

Corona Vaccination : कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणार देशातील ‘या’ बड्या कंपन्या; लस खरेदीसाठी हलचाली सुरु

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या वापरासाठी परवानगी देण्यात आलीय

प्रातिनिधिक फोटो (फोटो : अरुल होरायझन, एक्सप्रेस फोटो)

भारतातील अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करोना लसींचा डोस विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यापद्धतीचे नियजोनही अनेक कंपन्यांनी सुरु केल्याचे वृत्त आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील करोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जात आहे. असं असतानाच स्टील उत्पानद श्रेत्रातील अग्रेसर कंपन्यांपैकी एक असणाऱ्या जिंदाल स्टील अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड, त्याचबरोबर महिंद्रा ग्रुप आणि आयटीसीसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घेण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. सरकारकडून प्रथामिक स्तरावर करोना लसीची मागणी संपल्यानंतर ही लस बाजार उपलब्ध होईल. त्यावेळी या बड्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी करोनाची लस विकत घेतील असं सांगितलं जात आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी दिलं आहे.

आयटीसीच्या कॉर्परेट ह्यूमन रिसोर्सचे प्रमुख असणाऱ्या अभिताव मुखर्जी यांनी, “आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करायचं आहे. यासाठी आम्ही लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला असून आमच्यात सध्या चर्चा सुरु आहे” अशी माहिती दिली. भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

आणखी वाचा- COVID-19 Vaccination: देशात ४४७ जणांमध्ये दिसले लसीचे साइड इफेक्ट, तिघे रुग्णालयात दाखल; नगरमध्येही आठ जणांना लसीचा त्रास

टाटा स्टीलने दिलेल्या माहितीनुसार करोनाची लस व्यवसायिक पद्धतीने बाजारपेठेत उपलब्ध झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल. मागील वर्षी जगभरामध्ये लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंध असणाऱ्या लॉकडाउननंतर आता कारखाने आणि उद्योग व्यवसायस हळूहळू सुरळीत होत आहे. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. अनेकजण आपल्या मूळ गावी परतले होते. याचा फटका कंपन्यांनाही बसला होता.

आणखी वाचा- भारतानं अमेरिका, युके, फ्रान्सलाही टाकलं मागं; पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना दिली लस

जेएसपीएलचे ह्यूमन रिसोर्सचे प्रमुख असणाऱ्या पंकज लोचन यांनीही आम्ही मोठ्या प्रमाणात लसींचा पुरवठा करणाऱ्या लसनिर्मात्या कंपनीच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. सर्व करोनायोद्धांचे लसीकरण झाल्यानंतर बाजारपेठेत लस उपलब्ध होईल तेव्हा आम्ही ती आमच्या कर्मचाऱ्यांसाठी घेऊ इच्छितो असंही लोचन यांनी सांगितलं. मात्र किती संख्येने करोनाच्या लसी विकत घेणार आहेत किंवा कोणत्या कंपनीच्या लसी विकत घेणार आहेत यासंदर्भात लोचन यांनी कोणतीही माहिती सांगितली नाही.

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा असणाऱ्या आनंद महिंद्रांनाही आम्ही आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी करोनाची लस विकत घेऊ इच्छितो असं सांगितलं आहे. सरकारने ठरवलेल्या धोरणांनुसारच आम्ही यासंदर्भातील निर्णय घेऊन असंही महिंद्रांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच हिंदुस्तान युनिलिव्हरनेही आपल्या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्यास सांगितलं आहे. एकीकडे सरकारने करोना हेल्थ वॉरियर्स, आरोग्य कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांना करोनाची लस देण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करत असतानाच दुसरीकडे अनेक ंकंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या विचारात आहे. मात्र त्याचवेळी जगातील अनेक बड्या कंपन्या यासंदर्भात पुढाकार घेताना दिसत नाहीयत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 7:50 am

Web Title: indian companies prepare to buy vaccines for employees scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘ट्रॅक्टर मोर्चा’वर शेतकरी ठाम
2 आठ महिन्यांतील सर्वात कमी करोनाबळी
3 करोना ‘कॉलर टय़ून’मुळे दररोज तीन कोटी तास वाया
Just Now!
X