04 March 2021

News Flash

भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत ८०० फुट खोल दरीत पडल्याने दुर्देवी अंत

या दोघांना फिरण्याची आवड असून आपल्या प्रवासावर ते 'हॉलिडेज अॅण्ड हॅपिली अवर आफ्टर्स' नावाने ब्लॉगही लिहीत होते.

विष्णू विश्वनाथ आणि त्यांची पत्नी मीनाक्षी मूर्थी

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक हृदयदावक घटना समोर आली आहे. येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका दाम्पत्याचा ८०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. येथील येसेमिटी नॅशनल पार्कच्या टाफ्ट पॉइंट येथे ही घटना घडली आहे. सोमवारी या दोघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.


सुत्रांच्या माहितीनुसार, विष्णू विश्वनाथ (वय २९) आणि त्यांची पत्नी मीनाक्षी मूर्थी (वय ३०) हे दोघे कॅलिफोर्नियाच्या योसेमिटी नॅशनल पार्कमधील प्रसिद्ध टाफ्ट पॉइंट या दुर्गम पहाडी भागात पर्यटनासाठी गेले होते. या दोघांना फिरण्याची आवड असून आपल्या प्रवासावर ते ‘हॉलिडेज अॅण्ड हॅपिली अवर आफ्टर्स’ नावाने ब्लॉगही लिहीत होते. विश्वनाथ यांना सिस्को कंपनीत सिस्टिम इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाल्यानंतर हे दाम्पत्य न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले होते. अमेरिकन माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.


पार्कच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अनेक आठवड्यांपूर्वी या दाम्पत्याचा दरीत पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारण गेल्या गुरुवारी इथल्या लष्कराच्या जवानांना या पहाडी भागातून या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. याची माहिती मिळताच योसेमिटी नॅशनल पार्कचे अधिकारी सातत्याने या प्रकरणाचा तपास करीत होते. त्यानंतर अखेर सोमवारी हे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

विष्णू आणि मिनाक्षीचा ट्रॅव्हल ब्लॉग इथे पहा

या दोघांनी २००६ मध्ये चेंगान्नूर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरींग केले आहे. दोघांनाही फिरण्याचा छंद होता. त्यासाठी आपल्या फिरस्तीवर ते सातत्याने ब्लॉगही लिहीत होते. या दोघांचा हा ब्लॉग पाहिल्यानंतर त्यात जगभरातील त्यांचे प्रवासाचे विविध अनुभव लिहीलेले पहायला मिळतात. दरम्यान, हे दोघे दरीत कसे काय पडले ही घटना घडली त्यावेळी ते दोघे तिथे काय करीत होते, याचा शोध स्थानिक पोलीस प्रशासन घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 1:51 pm

Web Title: indian couple dies after falling 800 feet in californias yosemite national park
Next Stories
1 करवाचौथला केला उपवास आणि मग केली पतीची हत्या
2 नक्षलवादी हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन जवानांचा मृत्यू
3 ‘सुप्रीम कोर्टचा निर्णय काहीही असो राम मंदिर होणारच’
Just Now!
X