भारताच्या संरक्षणखात्याची वेबसाईट हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी हा प्रकार घडला असून साईट ओपन तर होत नव्हतीच वर एरर दाखवत एक वेगळेच चिन्ह दिसत होते. हे चिन्ह चिनी असावे असे काही जणांचे म्हणणे आहे, या वरून चिनी हॅकर्सनी वेबसाईट हँक केली का असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तर काही वेळानं या साईचवर पोचता येणार नाही असा मेसेज येत होता.

संरक्षण खात्याची वेबसाईट हॅक झाल्याची कबुली संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. वेबसाईट लवकरच पूर्ववत होईल असेही त्यांनी म्हटले आहे. भविष्यात असं पुन्हा कधीही होऊ नये यासाठीही उपाययोजना आम्ही करू हे सांगण्याची आवश्यकता नाही, अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली आहे.