01 March 2021

News Flash

भारतीय लोकशाही पाश्चिमात्य नव्हे, मानवी संस्था आहे; मोदींचा परदेशी सेलिब्रेटिंना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या लोकशाहीवर शंका घेणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

भारताची लोकशाही ही पाश्चिमात्य संस्था नाही तर एक मानवी संस्था आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या लोकशाहीवर शंका घेणाऱ्यांना आणि परदेशी सेलिब्रेटिंनी टोला लगावला आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले, “भारतीय लोकशाहीवर जे लोक शंका घेतात किंवा भारताच्या या मुलभूत शक्तीवर ज्यांना शंका आहे त्यांना मी विशेष आग्रहाने सांगेन की त्यांनी भारताची लोकशाही समजून घेण्याचा प्रयत्न करावा. भारताची लोकशाही ही कोणत्याही प्रकारे पाश्चिमात्य संस्था नाही, तर ती एक मानवी संस्था आहे. भारताचा इतिहास लोकशाही संस्थांच्या उदाहरणांनी भरलेला आहे. प्राचीन भारतात ८१ गणराज्यांचा उल्लेख आपल्याला आढळतो”

आणखी वाचा- देशात नव्या ‘आंदोलनजीवी’ जमातीचा उदय, जनतेनं त्यांच्यापासून सावध रहावं – पंतप्रधान

आज भारताच्या राष्ट्रवादावर चहुबाजूने होणाऱ्या हल्ल्यांपासून देशवासियांना सावध करणं गरजेचं आहे. भारताचा राष्ट्रवाद हा संकीर्ण, स्वार्थी आणि आक्रमकही नाही. हा सत्यम शिवम सुंदरमंच्या मुल्यांनी प्रेरित आहे, असं नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी म्हटल्याचं यावेळी मोदींनी सांगितलं. जग आपल्याला एखादा शब्द देतं आणि आपणही तो शब्द घेऊन चालत राहतो, याचं मला कधीकधी आश्चर्य वाटतं असंही मोदी यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की जे मनमोहन सिंग बोलले होते ते मोदीला करावं लागत आहे”; मोदींचा काँग्रेसचा टोला

आणखी वाचा- मूळ मुद्द्यावर विरोधक गप्प का आहेत? कृषी कायद्यांवर मोदींनी सोडलं मौन

भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र, आपण आपल्या तरुणांना हे शकवलं नाही की भारत ही लोकशाही व्यवस्थेची मातृभूमी आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे वारसारुपानं दिलं आहे त्यामुळे आपण हे गर्वानं सांगायला हवं. आपण तन-मन-धनाने मूलतः लोकशाहीवादी असल्यानेच भारत एक लोकशाही राष्ट्र आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 11:21 am

Web Title: indian democracy is a human institution not a western institution modis attack on foreign celebrities aau 85
Next Stories
1 करोनाविरुद्धची लढाई जिकंण्याचं श्रेय कोणत्याही सरकारला किंवा व्यक्तीला जात नसलं तरी…; पंतप्रधान मोदी
2 भयानक! हिमकडा कोसळल्यानंतर काही क्षणात अख्खं धरण गेलं वाहून
3 राष्ट्रपतींचं भाषण न ऐकूनही अनेकजण बरचं काही बोलले; मोदींचा विरोधकांना चिमटा
Just Now!
X