News Flash

दहशतवादी संघटनांवर कारवाई करा, अमेरिकेने पाकला सुनावले

भारत - अमेरिकेमधील संरक्षण आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य यासंदर्भातही दोघांमध्ये चर्चा झाली", असे पॅलाडिनो यांनी म्हटले आहे.

दहशतवादी संघटनांवर कारवाई करा, अमेरिकेने पाकला सुनावले

भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सोमवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांची भेट घेतली असून दहशतवादाच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरुन खडसावले आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा देण्याबाबत तसेच पाकिस्तानने तत्काळ दहशतवाद्यांवर कारवाई करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे.

परराष्ट्र सचिव विजय गोखले हे तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ यांची भेट घेतली. दहशतवादाविरोधातील लढाईत अमेरिका भारतातील जनता आणि सरकारसोबत आहे, अशी ग्वाही  पॉम्पिओ यांनी दिली.

परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते रॉबर्ट पॅलाडिनो यांनी या भेटीत काय चर्चा झाली याबाबतची माहिती माध्यमांना दिली. “पॉम्पिओ आणि गोखले यांच्यात पुलवामा हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा देण्याबाबत तसेच पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय भारत – अमेरिकेमधील संरक्षण आणि उद्योग क्षेत्रातील सहकार्य यासंदर्भातही दोघांमध्ये चर्चा झाली”, असे पॅलाडिनो यांनी म्हटले आहे.

पुलवामा हल्ला, त्यानंतर भारताने बालाकोट येथे केलेले हवाई हल्ले व पाकिस्तानने त्याला दिलेले प्रत्युत्तर या घटनाक्रमात भारत व पाकिस्तान या दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. पुलवामा हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चाळीस जवान हुतात्मा झाले होते. जैश ए महंमदने पुलवामा हल्ल्यात मोठी भूमिका पार पाडली होती, याचे पुरावे भारताने पाकिस्तानला सादर केले असून पाकिस्तान त्या संघटनेवर ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरला असल्याचे भारताने म्हटले आहे. भारत व पाकिस्तान यांच्यातील तणाव निवळण्यासाठी माइक पॉम्पिओ यांनी मोठी भूमिका पार पाडल्याचे अमेरिकेने गेल्या आठवड्यात म्हटले होते. या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 3:08 am

Web Title: indian foreign secretary vijay gokhale met us secretary michael pompeo discussed terrorism pakistan
Next Stories
1 पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार ठार
2 नोटाबंदीने काळा पैसा रोखण्यात अपयश
3 नीरव मोदी याच्यावर पुरवणी आरोपपत्र
Just Now!
X