22 July 2019

News Flash

न्यूझीलंडमधल्या गोळीबारात भारतीय जखमी, ओवेसींचे मदतीचे आवाहन

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एक भारतीय जखमी झाला आहे.

सौजन्य - इंडिया टुडे

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात एक भारतीय जखमी झाला आहे. या भारतीयाची ओळख पटली असून अहमद जहांगीर असे त्याचे नाव आहे. अहमद जहांगीर यांची प्रकृती गंभीर असून न्यूझीलंडमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एमआयएचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी टि्वट करुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयाला अहमद जहांगीरचा भाऊ इक्बाल जहांगीरला मदत करण्याचे आवाहन केले आहे. इक्बाल जहांगीर हैदराबादचा रहिवाशी असून भावाच्या कुटुंबाच्या मदतीसाठी इक्बालला न्यूझीलंडला जायचे आहे तरी सुषमा स्वराज आणि तेलंगण मुख्यमंत्री कार्यालयाने इक्बालसाठी आवश्यक ती व्यवस्था करावी असे ओवेसी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

व्हिसा प्रक्रिया वेगवान गतीने करण्यासाठी सहकार्य करा. न्यूझीलंडला जाण्यासाठी तो त्याची सर्व व्यवस्था करेल असे ओवेसी यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय वंशाचे नऊ जण बेपत्ता आहेत अशी माहिती न्यूझीलंडमधील भारतीय उच्चायुक्त सानजी कोहली यांनी दिली आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या या गोळीबारत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दहशतवाद्याची ओळख पटली असून तो ऑस्ट्रेलियाचा नागरीक आहे.

First Published on March 15, 2019 6:58 pm

Web Title: indian man critical after new zealand shootings