News Flash

‘बाप’ काढणाऱ्या रामदेव बाबांविरोधात डॉक्टरांचा संताप; पोलिसांत गुन्हा दाखल

रामदेवबाबा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत

संग्रहीत छायाचित्र (सौजन्य : ट्वीटर)

करोना काळात योग गुरू रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथी व डॉक्टरांवर केलेल्या विधानामुळे त्यांच्याविरोधात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने गुन्हा दाखल केला आहे. योगगुरु रामदेवबाबा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबा यांना अशी विधानं न करण्याचा सल्ला दिला आहे.

रामदेव बाबा यांच्यावर साथरोग कायदा, १८९७ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रामदेवबाबांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून देखील रामदेवबाबा यांच्यावर टीका होत आहे.


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते आपल्या अटकेवर प्रतिक्रिया देतांना म्हणाले, “अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही.” हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ कधीचा आहे. याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्विट करुन नेटकऱ्यांनी रामदेवबाबा यांना लक्ष्य केले आहे.

आणखी वाचा- ‘त्यांचा बापही मला अटक करु शकत नाही..’,रामदेवबाबांचा व्हिडिओ व्हायरल

रामदेवबाबा म्हणाले, लोक कधीकधी रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात. चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोक जो ट्रेंड चालवितो तो देखील शीर्षस्थानी असतो.रामदेवबाबा यांच्या या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी केंद्र सरकारलाही ट्रोल केले आहे. स्वामी रामदेव हे भाजप आणि पंतप्रधान यांच्या जवळचे असल्यामुळे, असे वक्तव्य करीत आहेत, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 4:47 pm

Web Title: indian medical association ima files police complaint against yog guru ramdev for committing offences vsk 98
Next Stories
1 रिपब्लिक बांगलाच्या पत्रकारावर गुन्हा; CBI अधिकारी बनून मागत होता खंडणी
2 पोलीसांपासून वाचवतो सांगत उकळत होता पैसे; भाजपा सरपंचाची करामत
3 व्हॉट्सअप ग्रुपवरील मेसेजेच्या आधारे मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेता येणार नाही : भारत सरकार