19 March 2019

News Flash

संपूर्ण आर्थिक नियोजन केवळ एका मिस्ड कॉलवर!

कंपनीने ‘वेल्थ डॉक्टर’ नावाचे प्ले स्टोअरवरून विनामूल्य डाऊनलोड करता येणारे मोबाइल अ‍ॅपही प्रस्तुत केले आहे.

कोणत्याही वित्तीय योजनांची विक्री न करता, अर्थ नियोजनविषयक शुद्ध सल्ला आणि अर्थसाक्षरता प्रसारातील सर्वात मोठी कंपनी ‘इंडियनमनी डॉट कॉम’ने आता केवळ मिस्ड कॉल करून हवे ते अर्थविषयक मार्गदर्शन विनामूल्य मिळविण्याची सोय सर्वसामान्यांना उपलब्ध केली आहे.

मूळात वित्तीय योजनांसंबंधी अल्पसमज, त्यातच वित्तीय सेवा क्षेत्रात विक्रेत्या-वितरकांकडून गैरमार्गाचा अवलंब आणि दिशाभूल होऊन चुकीच्या ठिकाणी पैसा गुंतविला जाण्याने होणारे नुकसान खूप मोठे आणि प्रसंगी कधीही भरून न निघणारे असते. पैसा कष्टाने कमावला जातो, त्याचा विनियोग खर्च, बचत, गुंतवणूक आणि उधार अशा मार्गाने केला जातो, या चार विनियोगाच्या पद्धती कशा हाताळल्या जातात, त्यावरून त्या व्यक्तीचे आर्थिक फलित निश्चित होत असते, असे इंडियन मनी डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्याधिकारी सी. एस. सुधीर यांनी स्पष्ट केले.

कंपनीने ‘वेल्थ डॉक्टर’ नावाचे प्ले स्टोअरवरून विनामूल्य डाऊनलोड करता येणारे मोबाइल अ‍ॅपही प्रस्तुत केले आहे. अथवा वित्तविषयक समस्या किंवा विमा, म्युच्युअल फंड, बँक खाते, कर्ज खाते, ठेवी, समभाग अथवा स्थावर मालमत्तेसंबंधी कोणत्याही प्रश्नांचे निराकरण इच्छुक थेट ‘वेल्थ डॉक्टर’शी संवाद साधून करून शकतील. त्यासाठी ०२२-६१८१ ६१११ या क्रमांकावर त्यांनी मिस्ड कॉल करावा लागेल, असे सुधीर यांनी स्पष्ट केले. वित्तविषयक मार्गदर्शनासाठी कंपनीने ९० सदस्य असलेल्या निपुण नियोजकांची नियुक्ती केली आहे.

अलीकडेच कर्नाटक राज्य पोलीस दलाने (केएसपी) त्यांचे आर्थिक शिक्षण भागीदार म्हणून इंडियन मनी डॉट कॉमची नियुक्ती केली आहे. केएसपीच्या एक लाख कर्मचाऱ्यांना वित्तीय निर्णय घेण्यास हे संकेतस्थळ मदत करते. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ग्राहकांना विविध आर्थिक योजनांविषयी शिक्षित करण्यासाठी इंडियन मनी डॉट कॉमचा उपयोग केला जात आहे.

First Published on June 14, 2018 1:18 am

Web Title: indian money com financial advisors