दिल्लीमध्ये २००५ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमागेही इंडियन मुजाहिदीनचाच हात होता, अशी माहिती दहशतवादी असदुल्ला अख्तर याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीतून पुढे आलीये. 
राजकारण्यांवर हल्ल्याचा प्रयत्नात होती इंडियन मुजाहिदीन
दिल्लीतील पहाडगंज, सरोजिनीनगर आणि गोविंदपुरी या भागांमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. दिल्ली पोलीसांनी केलेल्या तपासात या स्फोटांच्या संशयाची सुई ही लष्करे तोयबाकडे होती. पोलीसांनी संशयावरून काश्मिरी युवक तारिक अहमद दार याला अटक केली आहे. सध्या तो कोठडीत असून, त्याच्यावरील खटल्याची सुनावणी सुरू आहे. काश्मिरमध्येच २००७ मध्ये झालेल्या चकमकीत या बॉम्बस्फोटांच्या मास्टरमाईंडला ठार मारण्यात आल्याचा दावा पोलीसांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर अख्तर यांनी केलेल्या खुलाशामुळे या संपूर्ण तपासाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
‘त्या’ स्फोटाचा बदला घेण्यासाठीच भटकळने केले हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट
अख्तर हा स्वतः जरी या स्फोटांच्या कटात सहभागी नसला, तरी आझमगढमध्ये इंडियन मुजाहिदीनसाठी काम करणाऱया काही तरुणांनी हे स्फोट घडवून आणल्याचे त्याने पोलीसांना सांगितले. अतिफ अमीन याने मिर्झा बेग, मोहंमद साजिद, अरिझ खान, सादिक शेख आणि अरिफ बदार यांच्या साथीने दिल्लीतील घटनास्थळी बॉम्ब ठेवले होते, अशी माहिती अख्तरने दिली. बाटला हाऊस चकमकीमध्ये २००८ मध्ये अतिफ अमीन पोलीसांकडून मारला गेला. सादिक शेख आणि अरिफ बदार यांना पोलीसांनी मुंबईतून अटक केली असून, अन्य सर्व आरोपी अजून फरार आहेत.