जगात भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले. इतकेच नव्हे तर देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात, असेही सरसंघचालकांनी ठामपणे स्पष्ट केले.
ज्यांच्या स्वहिताला बाधा निर्माण होते तेव्हाच कट्टरतावाद आणि फुटीरतावाद पसरविला जातो, असे ते म्हणाले. मुघल सम्राट अकबराविरुद्ध महाराणा प्रताप यांचे सैन्य लढले, त्यामध्ये अनेक मुस्लिमांचा समावेश होता. देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येतात, असे भागवत यांनी सूचित केले. भारताने अन्य धर्मीय अनुयायांना हक्क दिले, तसे पाकिस्तानने दिले नाहीत आणि मुस्लीमांसाठी स्वतंत्र देश निर्माण केला, असेही भागवत यांनी ‘विवेक’ साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीच्या वेळी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 12:30 am