News Flash

भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले

भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर सोमवारी दुर्घटनाग्रस्त झाले. नियमित सरावासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलेले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले.

भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर सोमवारी तामिळनाडूच्या राजालीमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. नियमित सरावासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलेले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात जीवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. हेलिकॉप्टरच्या रोटर्समध्ये बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. भारतीय हवाई दलाच्या फायटर विमानाला झालेल्या अपघातानंतर काही आठवडयात ही घटना घडली.

मागच्या महिन्यात चार सप्टेंबरला भारतीय हवाई दलाचे मिग-२७ फायटर विमान राजस्थान जोधपूरमध्ये एका शेतामध्ये कोसळले होते. सुदैवाने वैमानिक या अपघातात बचावला होता.

जून महिन्यात गुजरात कच्छमध्ये हवाई दलाचे फायटर विमान कोसळले होते. या अपघातात भारताने आपले कुशल वैमानिक संजय चौहान यांना गमावले होते. नियमित सरावासाठी त्यांच्या विमानाने जामनगर हवाई तळावरुन उड्डण केले होते. या अपघातानंतर तीन दिवसांनी अहमदाबाद येथे हवाई दलाचे विमान कोसळले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 12:56 pm

Web Title: indian navy chetak helicopter crashes
टॅग : Indian Navy
Next Stories
1 चार वर्षांत २१ सरकारी बँकांकडून झालेल्या कर्जवसूलीपेक्षा सातपट कर्जे माफ
2 मृत्यूचा रस्ता! भारतात दररोज ५६ पादचाऱ्यांचा मृत्यू
3 नीरव मोदीला दणका, देश- विदेशातील ६३७ कोटींच्या संपत्तीवर टाच
Just Now!
X