27 February 2021

News Flash

Good News ! नौदल भरतीसाठी आता प्रवेश प्रक्रिया, कसा करायचा अर्ज?

देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी

(छायाचित्र नौदलाकडून ट्विट करण्यात आलं आहे)

देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या पदवीधारकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय नौदलाकडून अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी पहिल्यांदाच प्रवेश प्रक्रिया घेतली जाणार आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून याची सुरूवात होत आहे.


सप्टेंबरमध्ये इंडियन नेव्ही एन्ट्रन्स टेस्ट (आयएनईटी) घेण्यात येणार आहे. संगणक आधारित असलेल्या या परीक्षेसाठी दर सहा महिन्यांनी सूचना प्रसिद्ध केली जाईल. भारतीय नौदलाच्या संकेतस्थळावर (joinindiannavy.gov.in) याबद्दलची सर्व माहिती उपलब्ध असेल. या माहितीच्या आधारे अर्ज करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या पात्रतेनुसार पर्याय निवडू शकतात.

या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास थेट नौदलात अधिकारी होण्याची संधी मिळेल. या परीक्षेच्या माध्यमातून दोन प्रकारच्या (कायम आणि ठराविक कालावधीसाठी) सेवेतल्या अधिकाऱ्यांची भरती केली जाईल. सध्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डकडून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातात. आता आयएनईटीकडून उमेदवारांची परीक्षा घेतली जाईल. त्यातून गुणांच्या आधारे उमेदवार निवडले जातील. या परीक्षेसोबत यूपीएसईच्या माध्यमातून होणारी भरतीदेखील सुरुच असेल. यूपीएसई कम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिस एक्झामच्या (सीडीएस) माध्यमातून नौदलात अधिकाऱ्यांची भरती केली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 9:57 am

Web Title: indian navy introduces entrance test inet for officer entry
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 ‘एक्झिट पोल’शी संबंधित सर्व ट्विट हटवा; निवडणूक आयोगाचा ट्विटरला आदेश
3 सनी देओलच्या प्रचारात भाऊ बॉबी देओल का दिसत नाही?
Just Now!
X