News Flash

धक्कादायक! अमेरिकेत हॉस्पिटलबाहेर भारतीय नर्सची हत्या, नवऱ्याने तीक्ष्ण हत्याराने केले वार

त्यानंतर तिला गाडीखाली चिरडले...

फोटो सौजन्य - मेरिन जॉय फेसबुक

अमेरिकेत फ्लोरिडा येथे एका भारतीय नर्सची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. मेरिन जॉय (२६) असे या नर्सचे नाव आहे. ती मूळची केरळची आहे. मेरिन फ्लोरिडामधील कॉरल स्प्रिंग हॉस्पिटलमध्ये नोकरीला होती. मंगळावारी मेरिन रुग्णालयाबाहेर येत असताना नवऱ्याने मागून येऊन तिच्यावर हल्ला केला. नवऱ्याने त्याच्याजवळ असलेल्या तीक्ष्ण हत्याराने मेरिनवर वार केले. त्यानंतर तिला गाडीखाली चिरडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घरगुती वादातून ही हत्या झाली असे दक्षिण फ्लोरिडातील पोलिसांनी सांगितले. नवऱ्याने मेरिन जॉयवर अनेक वार केले. ती जखमी अवस्थेत तिला गाडीखाली चिरडले व आरोपीने तिथून पळ काढला असे पोलिसांनी सांगितले. मेरिन जॉयला लगेच पॉमपानो बीचजवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे तिचा काही वेळातच मृत्यू झाला असे फ्लोरिडा स्थित सन सेंटीनेल वर्तमानपत्राने म्हटले आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या कारच्या वर्णनावरुन पोलिसांनी मेरिनचा नवरा फिलीप मॅथ्यूला (३४) शोधून काढले. नवरा-बायकोमधील घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी मॅथ्यू विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. फिलीप मॅथ्यूला कॉरल स्प्रिंग येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:51 pm

Web Title: indian nurse stabbed to death by husband in us dmp 82
Next Stories
1 रिलायन्सचं मुख्यालय बँक घेणार ताब्यात; २९०० कोटींच्या कर्जप्रकरणी अनिल अंबानींना दणका
2 म्यानमार सीमेजवळ भारतीय लष्कराच्या तुकडीवर दहशतवाद्यांचा घातकी हल्ला, तीन जवान शहीद
3 भारताचा नेपाळला इशारा; “कालापानी प्रदेशात तुमच्या नागरिकांच्या अवैधरित्या प्रवेशावर आवर घाला”
Just Now!
X