News Flash

भारतीय वंशाचा जिहादी सिद्धार्थ धर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; जाणून घ्या या कारवाईचे कारण

सिद्धार्थ धर हा ३४ वर्षांचा आहे

आयसिस या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी सिद्धार्थ धर उर्फ अबू रुमासाहला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. सिद्धार्थ धर हा भारतीय वंशाचा असून नवीन जिहादी जॉन म्हणून त्याला ओळखले जाते.

अमेरिकेने बुधवारी आयसिसचा दहशतवादी सिद्धार्थ धर आणि अब्देलतिफ गैनी या दोघांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले. या कारवाईमुळे सिद्धार्थ धरची संपत्ती जप्त करता येणार आहे.

कोण आहे सिद्धार्थ धर ?
सिद्धार्थ धर हा मूळचा हिंदू असून तो ३४ वर्षांचा आहे. तो ब्रिटनमध्येच राहायचा. घर भाड्याने देण्याचा त्याचा व्यवसाय होता. १२ वर्षांपूर्वी सिद्धार्थने धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला. यानंतर त्याला ‘अबू रुमायसा’ या नावाने ओळखले जाऊ लागले. एआय मुहाजरौन या मूलतत्त्ववादी मुस्लीम गटात सामील झाला. पुढे तो आयसिसच्या संपर्कात आला. जामिनावर बाहेर आल्यावर २०१४ मध्ये तो पत्नी आणि मुलीसह ब्रिटनमधून सीरियाला पळाल्याचे सांगितले जाते. धर त्याच्या पत्नीमुळेच या मार्गावर गेल्याचे सांगितले जाते. सिद्धार्थ दहशतवादी मार्गावर कधी आणि का वळला हेच आम्हाला अजूनही समजत नाही, असे त्याच्या बहिणीने सांगितले होते.

नवा जिहादी जॉन
सिद्धार्थ धरला आयसिसचा नवा जिहादी जॉन म्हणून ओळखले जातो. दोन वर्षांपूर्वी धरचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. यात व्हिडिओतील व्यक्ती ब्रिटनसाठी हेरगिरी करणाऱ्या पाच जणांना ठार मारताना दिसत होता. व्हिडिओतील व्यक्तीचा आवाज हा सिद्धार्थचा असल्याचे समोर आले होते. त्याच्या आई आणि बहिणीने देखील तो आवाज सिद्धार्थचाच असावा, असे सांगितले होते. तेव्हापासून नवा जिहादी जॉन या टोपणनावाने त्याला ओळखले जाते.

आयसिसचा वरिष्ठ कमांडर
आयसिसच्या तावडीतून पळ काढण्यात यशस्वी ठरलेल्या निहाद बरकत या याझिदी अल्पवयीन मुलीने ब्रिटनमधील एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यात तिने सिद्धार्थनेच माझे अपहरण करुन माझी तस्करी केली, असा आरोप केला होता. गुलाम बनवणाऱ्या विदेशी लढवय्यांमध्ये सिद्धार्थही होता, असे तिने सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 2:04 pm

Web Title: indian origin isis man siddhartha dhar designated as global terrorist by us who is new jihadi john abu rumaysah
Next Stories
1 ‘पद्मावत’वर बहिष्कार टाका, गुजरातच्या उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
2 जिया खान आत्महत्याप्रकरणात सूरज पांचोलीची पुन्हा चौकशी करण्यास न्यायालयाचा नकार
3 प्रकाश करात यांच्यामुळे डाव्या पक्षांची दुरावस्था, सोमनाथ चॅटर्जींची टीका
Just Now!
X