23 September 2020

News Flash

अमेरिकन पबच्या स्वच्छतागृहात हिंदू देवतांची चित्रं; भारतीय वंशाच्या महिलेने झापले

घडल्या प्रकारानंतर आलेल्या मेलने पब प्रशासनाने मागितली माफी

फोटो सौजन्य- अंकिता मिश्रा

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये असलेल्या एका पबच्या स्वच्छतागृहातील भिंतींवर गणपती, सरस्वती, शंकर, राधाकृष्ण, काली माता, लक्ष्मी या आणि अशा अनेक हिंदू देवतांचे फोटो असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकेची नागरिक असलेल्या पण मूळ भारतीय असलेल्या अंकिता मिश्रा या महिलेने या संदर्भात पोस्ट करून या प्रकरणाला वाचा फोडली आहे. या पबला अंकिता मिश्रा यांनी खरमरीत शब्दात इमेल केला आहे. ज्यानंतर या फोटोंबद्दल पबने माफी मागितल्याचेही समजते आहे.

अंकिता मिश्रा यांनी ब्लॉगमध्ये काय म्हटलं आहे?
मी गेल्या महिन्यात न्यूयॉर्क येथील बुशविक या ठिकाणी असलेल्या हाऊस ऑफ यस या पबमध्ये मित्रांसोबत गेले होते. तिथल्या व्हिआयपी स्वच्छतागृहांमध्ये हिंदू देव देवतांची पेटिंग्ज मी पाहिली. ज्यामध्ये गणपती, काली माता, शंकर, सरस्वती यांसह अनेक देवी देवतांची चित्रं आहेत. यासंबंधी अंकिता मिश्रा यांनी हाऊस ऑफ यस पब प्रशासनाला इमेल लिहून यावर उत्तर मागितले.

हाऊस ऑफ यस हा पब खरंच चांगला आहे. या पबमध्ये मी अनेकदा आले आहे पण स्वच्छतागृहांमध्ये जे मी पाहिले ते धक्कादायक आहे. मात्र शनिवारी जेव्हा मी या पबच्या स्वच्छतागृहात आले तेव्हा मला धक्काच बसला. सगळ्यात आधी मला या ठिकाणी शंकराचे चित्र दिसले. त्यानंतर मी पाहू लागले तेव्हा मला गणपती, ब्रह्मदेव, राधाकृष्ण, सरस्वती, लक्ष्मी यांची चित्रं दिसू लागली. मला वाटले मी स्वच्छतागृहात नाही एखाद्या मंदिरात आले आहे. मात्र हे स्वच्छतागृह होते. लोक तिथे बूट घालून येत होते. स्वच्छतागृह बिनदिक्कतपणे वापरत होते. हे सगळे पाहून मला धक्काच बसला असे अंकिता मिश्रांनी म्हटले आहे.

इमेल पाठवून फटाकरले

अंकिता मिश्रा यांनी यासंदर्भात एक इमेल केला आणि एक ब्लॉग पोस्ट करून पब प्रशासनाला फटाकरले. भारतीय संस्कृतीत ज्यांना देवता मानले जाते, ज्यांची पूजा केली जाते, ज्या देवतांबद्दल भारताला आदर आहे.. अशा सगळ्यांची चित्रं पबमधल्या स्वच्छतागृहांमध्ये लावण्यात आली आहेत. मंदिरात कधीही बूट-चपला घालून प्रवेश केला जात नाही. मात्र या स्वच्छतागृहात लोक खुशाल बूट-चपला घालून प्रवेश करतात. प्रातर्विधी करतात. नाइट क्लबच्या स्वच्छतागृहात पब प्रशासनाने हिंदू देवतांची चित्रं लावलीच कशी काय? एका बॉटलसाठी ६०० डॉलरपेक्षा जास्त किंमत चुकवणाऱ्या ग्राहकांनाच या स्वच्छतागृहात जाता येते. मात्र स्वच्छतागृहांमध्ये हिंदू देवतांची चित्रं लावून त्यांचा अपमान करण्याचे कारणच काय? पब प्रशासनाने याचे उत्तर दिलेच पाहिजे असे अंकिता मिश्रा यांनी म्हटले आहे.

पब प्रशासनाने पाठवले उत्तर
अंकिता मिश्रा यांच्या इमेलवर उत्तर देत पब प्रशासनाने या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. स्वच्छतागृहांच्या भिंतीवर हिंदू देवतांची चित्रं लावण्याची जबाबदारी माझी आहे असे क्रिएटिव्ह डायरेक्टरने म्हटले आहे तसेच यासाठी आपण दिलगीर आहोत आणि ही चित्रं हटवण्यात येतील असंही आश्वासन या इमेलमध्ये देण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 2:48 pm

Web Title: indian origin woman writes strong worded letter to brooklyn pub for putting pictures of hindu deities on toilet walls
Next Stories
1 मुजफ्फरपूर बलात्कारप्रकरणी बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मांचे कोर्टासमोर आत्मसमर्पण
2 काँग्रेस म्हणजे फक्त अंधकार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
3 कौतुकास्पद! आई-आजीला नमस्कार करून पायलटने केले पहिले उड्डाण
Just Now!
X