News Flash

भारतीय वंशाच्या महिला डॉक्टरचा सिंगापूरमध्ये सन्मान

सिंगापूरमध्ये ३८ वर्षे वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या भारतीय वंशाच्या ७५ वर्षीय डॉक्टरला सन्मानित करण्यात आले आहे.

सिंगापूरमध्ये ३८ वर्षे वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या भारतीय वंशाच्या ७५ वर्षीय डॉक्टरला सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. उमा राजन या हा पुरस्कार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला आहेत.
राजन यांना कायदा व शिक्षण राज्यमंत्री इंद्राणी राजाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजाच्या विविध क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या महिलांसाठी हा पुरस्कार प्रेरणादायी ठरू शकेल, असे राजन पुरस्कार स्वीकारल्यावर म्हणाल्या. या पुरस्कारासह मिळालेली १० हजार डॉलर पारितोषिक रक्कम राजन यांनी स्वयंसेवी संस्था, बालकल्याण संस्था आणि आशियाई महिला कल्याण संस्थेला दान केली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2015 6:40 am

Web Title: indian origin women doctor honor in singapore
टॅग : Doctor
Next Stories
1 राष्ट्रीय सुरक्षा मंडळाने मंजूर केलेल्या प्रकल्पांची ‘कॅग’कडून तपासणी
2 पाकिस्तानची भारताविरोधात नवी तक्रार
3 गुंतवणूक निर्णय वेगात!
Just Now!
X