26 February 2021

News Flash

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सार्क परिषदेचं निमंत्रण पाठवणार पाकिस्तान

पंतप्रधान नरेंद्र मोदी निमंत्रण स्वीकारून सार्क परिषदेला जाणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानतर्फे सार्क परिषदेचे निमंत्रण पाठवलं जाणार आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता डॉक्टर मोहम्मद फैसल यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानात सार्क परिषद होणार आहे. यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण देण्यात येईल असं फैसल यांनी स्पष्ट केलं. इम्रान खान यांनी जेव्हा पहिल्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा पाकिस्तान भारतापुढे मैत्रीचा हात करेल असे म्हटलं होतं. आता पाकिस्तानतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सार्क परिषदेचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

१९ व्या सार्क परिषदेचे आयोजन २०१६ मध्येच पाकिस्तानात करण्यात येणार होतं. मात्र भारत, बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनी या परिषदेत सहभाग घेण्यास असहमती दर्शवली. त्यानंतर ही परिषदच रद्द करण्यात आली होती. उरी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भारताने या परिषदेला जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच सर्जिकल स्ट्राइक करून पाकिस्तानने केलेल्या उरी येथील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

२०१६ मध्ये सार्क देशांची एक बैठक पाकिस्तानात झाली होती. त्यावेळी भारताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह गेले होते. त्यानंतर भारताचा एकही नेता पाकिस्तानात गेलेला नाही. आता पाकिस्तानने सार्क परिषदेचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीकारणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 6:31 pm

Web Title: indian pm narendra modi to be invited to attend saarc summit says pakistan foreign office
Next Stories
1 ‘रावण’ नाही चुलबुल पांडे म्हणा – भीम आर्मी प्रमुख
2 शबरीमला मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या रेहाना फातिमाला अटक
3 दिलासादायक..! सहा आठवड्यात पेट्रोल १२ रूपयांनी स्वस्त
Just Now!
X