भारताचा आयआरएनएसएस १ ए या पहिल्या दिशादर्शक उपग्रहाचे सोमवारी रात्री ११ वाजून ४१ मिनीटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. श्रीहरीकोटा येथून एखाद्या उपग्रहाचे मध्यरात्री उड्डाण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पीएसएलव्ही सी २२ एक्सएल या प्रक्षेपकाच्या मदतीने आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह सोडला जाणार आहे. एखाद्या उपग्रहाचा प्रक्षेपण कालावधी ठरवताना त्याची कक्षा व इतर बाबी लक्षात घेतल्या जातात. त्या गरजा रात्री ११.४१ या वेळेला पूर्ण होत असल्याने हे उड्डाण मध्यरात्री होणार असल्याचे इस्रोच्या सूत्रांनी सांगितले. आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह पीएसएलव्हीच्या एक्सएल या सुधारित प्रक्षेपकावर ठेवण्यात आला आहे. इस्रोच्या पीएसएलव्ही प्रक्षेपकाची ही २४ वी मोहीम आहे. हा उपग्रह उड्डाणानंतर अवघ्या वीस मिनिटात अवकाशात जाईल. आयआरएनएसएस १ ए हा उपग्रह १४२५ किलोचा असून त्याचा आयुष्यकाल १० वर्षे आहे.  
वाहने शोधणे, आपत्ती व्यवस्थापन, प्रवासी व गिर्यारोहकांना दिशादर्शन, चालकांसाठी आवाजाची दिशा ओळखणे, सागरी दिशादर्शन, हवाई सर्वेक्षण असे या उपग्रहाचे उपयोग आहेत. सात उपग्रहांच्या आयआरएनएसएस प्रणालीत तीन भूस्थिर व चार सूर्यसापेक्ष कक्षेतील उपग्रह असतील, ते पृथ्वीपासून ३६ हजार कि.मी उंचीवर असतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian pslv successfully launches irnss 1a navigation satellite
First published on: 02-07-2013 at 01:56 IST