28 February 2021

News Flash

रेल्वेची नवी सेवा, ऑनलाइन दिसणार आरक्षण यादी

आरक्षित केलेल्या जागा आणि उपलब्ध असलेल्या जागा वेगवेगळ्या रंगांनी दाखविल्या जाणार

(संग्रहित छायाचित्र)

विमान प्रवासाप्रमाणे आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या आवडीनुसार सीट निवडता यावं यासाठी ‘ऑनलाइन चार्ट’ची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता प्रवाशांना तिकीट आरक्षित करतानाच उपलब्ध असलेल्या आसनांबाबत अर्थात आरक्षणाच्या सद्यस्थितीची माहिती मिळेल.

रेल्वेच्या या नव्या सेवेद्वारे प्रवाशांना गाडीच्या डब्याची सचित्र माहिती (ग्राफिकल प्रेझेंटेशन) तसेच ‘बर्थ’नुसार तपशील मिळणार आहे. यासाठी रेल्वेची वेबसाइट http://www.irctc.co.in वर CHARTS / VACANCY असा एक नवा पर्याय सुरू करण्यात आला आहे. या नव्या सेवेद्वारे आरक्षित केलेल्या जागा आणि उपलब्ध असलेल्या जागा वेगवेगळ्या रंगांनी दाखविल्या जाणार आहेत. ‘मोबाइल इंटरनेटवरही ही यंत्रणा उपलब्ध असणार आहे, यामुळे रेल्वे तिकीट आरक्षणाच्या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असं केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले.

येत्या 20 दिवसांमध्ये ही सुविधा शताब्दी आणि राजधानी गाड्यांना उपलब्ध होणार आहे. उपलब्ध आसनांबाबत ऑनलाइन माहिती उपलब्ध असेल, त्यामुळे तिकीट तपासनीसला शोधण्याची गरज राहणार नाही. ही यंत्रणा सगळ्या गाड्यांबाबत उपलब्ध करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 11:03 am

Web Title: indian railway reservation chart vacant berths available online
Next Stories
1 दहशतवाद्यांविरोधात कारवाई करा, जपानने पाकिस्तानला सुनावलं
2 भारताची कारवाई योग्यच, अमेरिकेचा पाठिंबा; अजित डोवाल-माइक पॅम्पिओ यांच्यात फोनवरुन चर्चा
3 अभिनंदनला दहा दिवसात पाठवा – भारताचा पाकिस्तानला संदेश
Just Now!
X