भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आंध्र प्रदेशातील पेंडुर्थी आणि कोट्टावालसा या रेल्वेलाईनवर अवघ्या ४ तासात ५० मिनिटात सबवे क्रॉसिंग अर्थात भुयारी मार्ग उभारला. काही महिन्यांपूर्वीच हा मर्यादित उंचीचा भुयारी मार्ग उभारण्यात आला. सोशल मीडियावर रेल्वेने केलेल्या कामगिरीचे कौतुक होताना दिसते आहे. पेंडुर्थी आणि कोट्टावालसा दरम्यान लेव्हल क्रमांक ४८४ वर हा मार्ग उभारण्यात आल्याचे समजते आहे. मर्यादित उंचीच्या या भुयारी मार्गाला २०१७ मध्ये मंजुरी मिळाली होती. हा मार्ग बांधण्यासाठी ३ हेवी ड्युटी क्रेन्स, ५ ट्रक, १ हजार वाळू गोण्या, हेवी वेट जॅक्स वापरण्यात आले. अशीही माहिती मिळते आहे. इंडिया टुडे ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

राजेंद्र बी अकेकर यांनी या संदर्भातला एक व्हिडिओही ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये हे काम कसे पूर्ण करण्यात आले याचा एक धावता आढावा घेण्यात आला. एक्स्प्रेस गाड्या ट्रॅकवरून जात असतानाही वेगाने हे काम सुरु होते हे या व्हिडिओत दिसते आहे. १ मिनिट ११ सेकंदाच्या या व्हिडिओत हे सबवे क्रॉसिंग उभारण्याचे काम किती जलद गतीने झाले याचा अंदाज येऊ शकतो.

पाहा व्हिडिओ